• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | मिरजेत तब्बल १९ कोटी २४ लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त, ३ जण ताब्यात : स्थानिक दुचाकीचा सहभाग असल्याने संशय बळावला..?

Admin by Admin
March 18, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | मिरजेत तब्बल १९ कोटी २४ लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त, ३ जण ताब्यात : स्थानिक दुचाकीचा सहभाग असल्याने संशय बळावला..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • धडक कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर..! ताब्यात घेतले शिरवडेकर, सागवेकर व खोबरेकर..!!

व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस ही अतिशय सुगंधी असते. अंबर ग्रीसला ‘समुद्रातील तरंगते सोने’ असेही म्हटले जाते.

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – 18 मार्च : सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातून कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या म्हैसाळ रस्ता परिसरातील वांडरे कॉर्नर येथे व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. या अंबर ग्रीसची किंमत तब्बल १९ कोटी २४ लाख रूपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने इतर पोलीस ठाण्याच्या व वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही धडक कारवाई केली. व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना पकडले आहे. या कारवाईत १९ किलो १७२ ग्रॅम वजनाच्या व्हेल मासा उलटी (अंबर ग्रीस) सापडली. याशिवाय एक अल्ट्राज कंपनीची चारचाकी गाडी व एक स्थानिक आरटीओ पासिंगची मोपेड दुचाकी असा सुमारे १९ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.

व्हेल माशाची उलटी एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्याची ही मिरज पोलिसांची पहिलीच कारवाई आहे. व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी काही जण येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधिक्षक रितू खोकर व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई केली.

तस्करी करणारे मंगेश माधव शिरवडेकर वय 36 वर्षे (रा. विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी जवाहर नगर, कोल्हापूर) व संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर वय 35 वर्षे (रा. वायरी मालवण तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग) यांच्यासह वैभव भालचंद्र खोबरेकर वय 29 वर्षे रा. मुळगाव कवटी कुडाळ सध्या राहणार देवबाग मयेकरवाडी, ता.मालवण, जि. सिंधुदुर्ग ) यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ही कारवाई मध्यरात्री करण्यात आली. या धाडसी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, वैभव पाटील, सचिन सनदी, निलेश कदम, संदीप मोरे, आमिरशा फकीर, लक्ष्मण कौजलगी, सचिन फडतारे, श्रीकांत केंगार, दीपक परीट यांच्यासह महात्मा गांधी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस फौजदार धनंजय चव्हाण, अभिजीत धनगर, बसवराज कुंदगुळ व मिरज वाहतूक शाखेतील फारूक नालबंद, राहुल सातपुते व उदय लवटे यांनी सहभाग घेतला.

Previous Post

सांगली | शेतकऱ्यांचा पाणीप्रश्नावर टाहो.! ४५ गावांतील पिके वाळली.

Next Post

सांगली ब्रेकिंग | महाविकास आघाडीच्या जागावाटपावर ‘गोपनीय खबऱ्या’ ला दिल्या नेत्यांनी प्रतिक्रिया : म्हणाले, वेळ प्रसंगी…..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

सांगली ब्रेकिंग | महाविकास आघाडीच्या जागावाटपावर 'गोपनीय खबऱ्या' ला दिल्या नेत्यांनी प्रतिक्रिया : म्हणाले, वेळ प्रसंगी.....

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group