• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | शेतकऱ्यांचा पाणीप्रश्नावर टाहो.! ४५ गावांतील पिके वाळली.

Admin by Admin
March 18, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – राजकीय अनास्थेमुळे पाण्याअभावी पलूस, वाळवा, तासगाव तालुक्यांतील 45 गावांमधील 13 हजार 366 हेक्टर क्षेत्रातील पिके वाळू लागली आहेत. शेतकरी पाणीप्रश्नावर टाहो फोडत असताना प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात समाधान मानत आहे.याबद्दल शेतकऱयांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सांगली जिह्यात सर्वच तालुक्यांत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. जिह्यात दुष्काळाची भयावह अवस्था पाहायला मिळत आहे. सांगली जिल्हा राज्य शासनाने दुष्काळी म्हणून जाहीर केला आहे; पण प्रत्यक्षात कुठेही दुष्काळाच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जात नाहीत. राज्यकर्ते आणि प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे शेतकरी दुष्काळाचे चटके सहन करीत आहेत. पलूस, तासगाव, वाळवा तालुक्यांत दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. काही गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे.

कृष्णा व आरफळ कालव्यातून पाणी सोडण्याची राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून केवळ घोषणाच होत आहे. पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱयांवर संघर्ष करण्याची वेळ आली आहे. पलूस तालुक्यात तुपारीपासून वसगडेपर्यंतच्या शेतीला वरदान ठरलेल्या कृष्णा कालव्यातही पाणी सोडण्यासाठी सातारा जिह्यातील काही लोकप्रतिनिधी टाळाटाळ करीत असल्यामुळे ‘जलसंपदा’चे अधिकारीही हतबल झाले आहेत.

द्राक्ष, केळीच्या बागा धोक्यात

पलूस तालुक्यातील द्राक्षबागा, ऊस, केळी आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱयांनी मंत्री, लोकप्रतिनिधी, पाटबंधारे अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदने दिली, चर्चा केली, आंदोलने केली, तरीही कालव्यात पाणी सोडले जात नाही. त्यामुळे या भागातील द्राक्षबागा, केळी, ऊस पाण्याअभावी वाळून चालला आहे.

Previous Post

महिला पोलीस अधिकारी रस्त्यावर गाडी लावून गेल्या बाजारात; वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पडली अडकून..!

Next Post

मोठी ब्रेकिंग | मिरजेत तब्बल १९ कोटी २४ लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त, ३ जण ताब्यात : स्थानिक दुचाकीचा सहभाग असल्याने संशय बळावला..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | मिरजेत तब्बल १९ कोटी २४ लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त, ३ जण ताब्यात : स्थानिक दुचाकीचा सहभाग असल्याने संशय बळावला..?

मोठी ब्रेकिंग | मिरजेत तब्बल १९ कोटी २४ लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त, ३ जण ताब्यात : स्थानिक दुचाकीचा सहभाग असल्याने संशय बळावला..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group