Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | महापालिकेने ‘हे’ तात्काळ बंद करावे : अन्यथा.. आम्ही ते भुईसपाट करू..!

Admin by Admin
March 17, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
0
सांगली ब्रेकिंग | महापालिकेने ‘हे’ तात्काळ बंद करावे : अन्यथा.. आम्ही ते भुईसपाट करू..!

 

‘धर्मवीर संभाजी महाराज गोरक्षक सेने’ची घंटानाद आंदोलनाद्वारे मागणी !

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – येथील गणेशनगर परिसरात अनधिकृतपणे चालू असलेले पशूवधगृह बंद करण्याविषयी अनेक वेळा तक्रारी करूनही ते आजही चालूच आहे.

महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही येथे गोवंश हत्या, तसेच अनेक जनावरांच्या कत्तली केल्या जात आहेत. त्यामुळे प्रचंड प्रदूषण होत असून येथील सर्वच नागरिकांच्या जीविताला हानी पोचत आहे. असे असूनही महापालिका प्रशासन संबंधितांवर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने हे पशूवधगृह त्वरित बंद करावे या प्रमुख मागणीसाठी १५ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘धर्मवीर संभाजी महाराज गोरक्षक सेने’च्या वतीने ‘घंटानाद आंदोलन’ करण्यात आले.

१. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री. नितीन शिंदे म्हणाले की, राज्यात गोहत्या बंदी कायदा असूनही अनधिकृतपणे चालू असलेल्या या पशूवधगृहावर महापालिकेने बुलडोझर फिरवावा.

२. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनायकराव येडके यांनी, ‘१५ दिवसांच्या आत या पशूवधगृहावर कारवाई करावी आणि याचसमवेत सर्व गोरक्षकांना पोलीस संरक्षण आणि विमा संरक्षण देण्यात यावे’, अशी मागणी केली.

३. धर्मवीर संभाजी महाराज गोरक्षक सेनेचे सचिव श्री. धर्मेंद्र कोळी म्हणाले, ‘प्रशासनाने हे पशूवधगृह न हटवल्यास गोरक्षक सेना स्वतःहून भुईसपाट करेल.’

४. ‘मातंग समाजाची दिशाभूल करून वारंवार गोहत्या करणारे अनिल ऐवळे आणि त्यांचे सहकारी यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी गोरक्षक सेनेचे श्री. अभिमन्यू भोसले यांनी केली.

५. ‘गणेशनगर येथील अनधिकृत पशूवधगृह बंद करण्याच्या या मागणीला शिवसेना १०० टक्के पाठिंबा देत आहे’, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उमाकांत कार्वेकर यांनी या वेळी घोषित केले. शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख राणीताई कमलाकर यांनीही या सर्व मागणीस १०० टक्के पाठिंबा दिला आहे, तसेच गोरक्षक सेनेसह रस्त्यावर उतरण्याची चेतावणीही त्यांनी दिली.

६. गोरक्षक श्री. नीतेश ओझा यांनी गणेशनगर परिसरात अनेक घरांमध्येही अनधिकृत जनावरांच्या कत्तली केल्या जात असून या सर्वांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

७. या आंदोलनाच्या वेळी उपस्थित मान्यवरांसह हिंदु एकता आंदोलन सांगलीवाडीचे अध्यक्ष श्री. अनिरुद्ध कुंभार, हिंदु एकता आंदोलन ग्रामीणचे अध्यक्ष श्री. विष्णुपंत पाटील, हिंदु एकता आंदोलन मिरजचे अध्यक्ष श्री. सोमनाथ गोटखिंडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री प्रमोद धुळुबुळु, श्रीकांत जमदाडे, प्रशांत देसाई, आकाश जाधव, तसेच महिला आघाडीच्या सौ. सुजाता हेगडे यांसह अन्य अनेक गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

Previous Post

बिग ब्रेकिंग | ‘या’ पदांसाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द..! उडाली खळबळ

Next Post

सांगली ब्रेकिंग | ‘या’ पक्षाचा उमेदवार निश्चित..! मविआचा सांगली लोकसभेचा तिढा सुटला!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | ‘या’ पक्षाचा उमेदवार निश्चित..! मविआचा सांगली लोकसभेचा तिढा सुटला!

सांगली ब्रेकिंग | 'या' पक्षाचा उमेदवार निश्चित..! मविआचा सांगली लोकसभेचा तिढा सुटला!

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014