• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सांगली, मिरजेसह कोल्हापुरातील २२ जणांवर गुन्हा, जुगार अड्ड्यावर छापा

Admin by Admin
March 2, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगली, मिरजेसह कोल्हापुरातील २२ जणांवर गुन्हा, जुगार अड्ड्यावर छापा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गोपनीय खबऱ्या | ऑनलाईन प्रतिनिधी : कागल तालुक्यातील अर्जुनी पैकी अर्जुननगर येथे महालक्ष्मी सामाजिक कला, क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने छापा टाकून 22 संशयितांकडून एक स्कॉर्पिओ, चार दुचाकी, 14 मोबाईल हँडसेट व रोकड असा एकूण 7 लाख 90 हजार 840 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुरुवारी (दि. 29) मध्यरात्री अर्जुनी येथे श्री महालक्ष्मी सामाजिक कला, क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या ठिकाणी अंदर-बाहर नावाचा जुगार 22 जण पैसे लावून खेळत असताना आढळून आले. त्यांच्याकडील 2 लाख 29 हजार 840 ची रोख रक्कम तसेच इतर ऐवज असा 7 लाख 90 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत चालक अनिल व्यंकटेश यादव (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), मालक युवराज भाऊसो जाधव, (रा. खडकेवाडा, ता. कागल), जागा मालक विनायक महादेव कामटे, (रा. अर्जुननगर, अर्जुनी) कामगार अब्दुल रहिमान मकडी (रा. अभयनगर, उर्मिला पार्क, सांगली) तसेच जुगार खेळण्यासाठी आलेले रवींद्र बाबुराव गुरव (रा. पांगिरे, ता. निपाणी, जि. बेळगाव), कैलास गणेश भिसे (रा. 6 वी गल्ली, शिवाजीनगर, निपाणी), मोहन मारुती चव्हाण (रा. शिवाजीनगर, निपाणी), अशोक राजू शिकलगार (रा. आंबेडकर सर्कल, महालिंगपूर, ता. मुधोळ), दीपक सदाशिव दौडमणी (रा. रबकवी, ता. मुधोळ), मुत्तू पंडित मैत्री (रा. रबकवी, ता. मुधोळ), बसवराज लकमा पुजारी (रा. नांगनूर, ता. गोकाक), राहुल रतन शिकलगार (रा. महालिंगपूर, ता. मुधोळ), सर्फराज वाहिद बारगीर (रा. गुरुवार पेठ, मिरज), दस्तगीर दावल शेख (रा. ख्वाजा झोपडपट्टी, मिरज), मुनाफ खली कलाल (रा. शिवाजीनगर, निपाणी), आप्पासाहेब धोंडिराम कुरळुपे (रा. अक्कोळ, ता. चिक्कोडी), केशव बसाप्पा कोरवी (रा. खडकलाट, ता. चिक्कोडी), मोहन मुराप्पा शिंत्रे (रा. पडलीहाळ, ता. निपाणी) अनिल सुरेश पवार ऊर्फ पाथरूट (रा. शिवाजीनगर, निपाणी), कृष्णात पाटील (डिग्रज, जि. सांगली), सलीम इलाई मुजावर (रा. हमालवाडी, कुपवाड) अशा 22 जणांविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, खंडेराव कोळी, शिवाजी जामदार, विलास किरोळकर, संजय पडवळ, सचिन देसाई व संतोष पाटील यांनी सहभाग घेतला.

Previous Post

मोठी बातमी | सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा विस्कळीत : डॉक्टर संपावर..!

Next Post

मोठी बातमी | निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का; 12 आमदार जाणार ठाकरे गटात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का; 12 आमदार जाणार ठाकरे गटात

मोठी बातमी | निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का; 12 आमदार जाणार ठाकरे गटात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group