• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा विस्कळीत : डॉक्टर संपावर..!

Admin by Admin
February 24, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
मोठी बातमी | सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा विस्कळीत : डॉक्टर संपावर..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्ड संघटनेने सुरु केलेल्या संपाचा परिणाम सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात जाणवू लागला आहे. शनिवारी अनेक नियमित शस्त्रक्रिया रद्द झाल्या.सकाळी निवासी डॉक्टरांनी मिरजेत शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयासमोर निदर्शने केली.

सांगली व मिरजेतील सुमारे 290 निवासी डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत. तातडीच्या सेवा सुरु असल्या तरी नियमित उपचार मात्र विस्कळीत झाले आहेत. आज शनिवार असल्याने रुग्णांची गर्दी तुलनेने कमी होती, त्यामुळे प्रशासनाला कामकाज हाताळणे शक्य झाले. सोमवारपर्यंत संप मिटला नाही, तर मात्र गंभीर परिणाम दिसणार आहेत.

संपामुळे आज क्ष किरण विभागातील नियमित चाचण्या बंद राहिल्या. तातडीच्या तपासण्या मात्र झाल्या. तातडीच्या शास्त्रक्रियादेखील झाल्या. वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख स्वतः बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागात उपस्थित राहिले. रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली आहे.

संप आणि आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अमोद भडभडे, डॉ. विजय कदम, डॉ. मोहिनी कोठावळे, डॉ. विवेक पाटील, डॉ. रोशनी राठोड, डॉ. अकिब कुरेशी, डॉ. प्रशांत विधाते, डॉ. आस्था चावला आदी करत आहेत.

उद्या होणार संपावर चर्चा

दरम्यान, निवासी डॉक्टरांच्या संपासंदर्भात रविवारी मुंबईत बैठक होणार आहे. शासन प्रतिनिधी व आंदोलक यांच्यात चर्चा होणार आहे. त्यामध्ये संपावर तोडगा अपेक्षित आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | जिल्ह्यातील ‘ड्रग्ज माफियां’ ची पाळेमुळे खणून कठोर कारवाई करा ! – भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे मागणी.

Next Post

मोठी ब्रेकिंग | सांगली, मिरजेसह कोल्हापुरातील २२ जणांवर गुन्हा, जुगार अड्ड्यावर छापा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगली, मिरजेसह कोल्हापुरातील २२ जणांवर गुन्हा, जुगार अड्ड्यावर छापा

मोठी ब्रेकिंग | सांगली, मिरजेसह कोल्हापुरातील २२ जणांवर गुन्हा, जुगार अड्ड्यावर छापा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group