• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | जिल्ह्यातील ‘ड्रग्ज माफियां’ ची पाळेमुळे खणून कठोर कारवाई करा ! – भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे मागणी.

Admin by Admin
February 24, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कुपवाड येथे पुणे आणि सांगली पोलिसांनी कारवाई करत ३०० कोटी रुपयांचे १४० किलो अमली पदार्थ जप्त केले. सांगली-मिरज आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे दिसून येत आहे.

मोठ्या संख्येने तरुण या अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे वाटोळे होत आहे. तरी जिल्ह्यातील ‘ड्रग्ज माफियां’ ची पाळेमुळे खणून कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.

या निवेदनावर भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, चैतन्य भोकरे, अजिंक्य हंबर, सुमेध ठाणेदार, अनिल रसाळ, उमेश हारगे, शाम भंडारे यांच्या स्वाक्षरी आहेत.

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात काय म्हटले.?

१. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असून सांगली पोलिसांना याचा सुगावा लागत नाही, ही अतिशय खेदाची गोष्टी असून यामुळे पोलिसांची विश्वासार्हता न्यून होत आहे.

२. मिरजेतील रेल्वेस्थानक परिसरात अमली पदार्थांचे सेवन करून गुंडांचा हैदोस चालू आहे. यामुळे शहरातील नागरिक, तसेच बाहेर गावाहून आलेले प्रवासी यांना त्रास होत आहे. या गुंडांकडून अनेक वेळा प्रवाशांवर आक्रमण करून त्यांची लूटमार करण्यात आली आहे.

३. अमली पदार्थांचे सेवन केलेले अनेक गुन्हेगार अल्पवयीन असल्याचेही वेळोवेळी निष्पन्न झाले आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेले तरूण किरकोळ कारणासाठी थेट शस्त्रात्रांचा वापर करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी पोलीस प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून तातडीने हालचाल करावी.

Previous Post

मोठी बातमी | राज्यातील पोलीस संतापले.! रजा रोखीकरण रद्द केल्याने पोलीस दलात नाराजी, पोलिसांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला संताप

Next Post

मोठी बातमी | सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा विस्कळीत : डॉक्टर संपावर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा विस्कळीत : डॉक्टर संपावर..!

मोठी बातमी | सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा विस्कळीत : डॉक्टर संपावर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group