• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | राज्यातील पोलीस संतापले.! रजा रोखीकरण रद्द केल्याने पोलीस दलात नाराजी, पोलिसांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला संताप

विशेष प्रतिनिधी | संकेतराज बने | शासन निर्णय मागे घेण्याची मागणी.

Admin by Admin
February 23, 2024
in क्राईम, मंत्रालय
1 min read
0
वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचाऱ्याचे निलंबन..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • पोलीस कर्मचारी सण-उत्सव कुटुंबियांसह साजरे करू शकत नाहीत. त्याची भरपाई व्हावी म्हणून अतिरिक्त अर्जित रजा दिली होती. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द केल्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पोलिसांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची मागणी अनेकांनी समाजमाध्यमांद्वारे केली आहे.

राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना १५ दिवासांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द केल्याचा शासन निर्णय काढण्यात आला. या निर्णयाचे पडसाद राज्यभर उमटत असून पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी वर्गांत नाराजीचा सूर आहे.अनेकांनी आपली खदखद समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे.

राज्य पोलीस दलातील पोलीस कर्मचारी ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना १९८९ पासून वर्षांला १५ दिवसांची अतिरिक्त अर्जित रजा व निवृत्त होताना रजेचे रोखीकरण (एन्कॅशमेंट) करण्याची सुविधा लागू केली आहे. कारण अन्य विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवार नियमित सुटी असते.

तसेच सण, उत्सव, जयंती आणि अन्य शासनाच्या सुट्यासुद्धा लागू असतात. अन्य शासकीय विभागाच्या तुलनेत पोलीस विभागाला दर शनिवारी सुटी नसते. तसेच सण-उत्सवादरम्यान सुटी तर सोडाच अतिरिक्त कर्तव्यावरही राहावे लागते. त्या दरम्यान पोलिसांच्या हक्काची सुटी म्हणजे साप्ताहिक रजासुद्धा बंद करण्यात येतात. तसेच हिवाळी, उन्हाळी आणि पावसाळी विधानसभा अधिवेशनादरम्यान बंदोबस्तामुळे पोलिसांच्या सुट्ट्या तत्काळ रद्द करण्यात येतात. तसेच साप्ताहिक रजाही बंद करण्यात येतात.

तसेच हिवाळी, उन्हाळी आणि पावसाळी विधानसभा अधिवेशनादरम्यान बंदोबस्तामुळे पोलिसांच्या सुट्ट्या तत्काळ रद्द करण्यात येतात. तसेच साप्ताहिक रजाही बंद करण्यात येतात. यासह राज्यात आंदोलने, रॅली, राजकीय पुढाऱ्यांसाठी व्हीआयपी बंदोबस्तात पोलीस १६-१८ तास कर्तव्य बजावत असतात. पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्या उपभोगता येत नसल्याचे दुःख होतेच परंतु किमान १५ दिवसांच्या सुट्यांचे पैसे मिळत असल्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला होता. २१ फेब्रुवारीला शासनाने १५ दिवासांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द केल्याचा शासन निर्णय काढल्याने पोलीस दलात नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

Previous Post

मोठी बातमी, मनोज जरागेंना हायकोर्टाचा दे धक्का, बजावली नोटीस

Next Post

सांगली ब्रेकिंग | जिल्ह्यातील ‘ड्रग्ज माफियां’ ची पाळेमुळे खणून कठोर कारवाई करा ! – भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे मागणी.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

सांगली ब्रेकिंग | जिल्ह्यातील 'ड्रग्ज माफियां' ची पाळेमुळे खणून कठोर कारवाई करा ! - भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे मागणी.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group