• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी, मनोज जरागेंना हायकोर्टाचा दे धक्का, बजावली नोटीस

Admin by Admin
February 23, 2024
in राजकीय
1 min read
0
मोठी बातमी, मनोज जरागेंना हायकोर्टाचा दे धक्का, बजावली नोटीस
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण लागू केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. अशातच त्यांनी नव्याने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

मात्र,आंदोलन हिसंक होणार नाही? याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का? असे सवाल करत हायकोर्टाने जरांगे यांना नोटीस बजावली आहे.

गुणरत्न सदावर्ते विरूद्ध मनोज जरांगे पाटील याचिका हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी जरांगे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दलही युक्तिवाद करण्यात आला.

‘जरांगेंवर जे आरोप होत आहे, ते त्यांना बदनाम करण्याचा डाव आहे. जरांगेंचं आंदोलन हे सध्या शांततेतच सुरू आहे. राज्य सरकारला आंदोलनाचा विरोध आपल्या अंगावर घ्यायचा नाही. एखादा याचिकाकर्ता उभा करून ते कोर्टाकडून निर्देश मागत आहेत, असा आरोप जरांगेंचे वकील विजय थोरात यांनी केला आहे. आमचं आंदोलन हे शांततापूर्वकच असेल, अशी हमीही जरांगेंच्या वकिलांची हायकोर्टात दिली.

‘मनोज जरांगे यांना भुमिका स्पष्ट करावी. मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत? आंदोलन हिसंक होणार नाही ? याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का? या सर्व मुद्यांवर मनोज जरांगेंना 26 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहे.

दरम्यान, मनोज जरांगेंनी आता राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. अशाप्रकारे आंदोलनातून प्रशासन आणि जनतेला वेठीस धरणं योग्य नाही. कोर्टाच्या निर्देशांनुसार जरांगेंनी वैद्यकीय उपचार घेतले आहेत, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्तांनी कोर्टात दिली आहे.

Previous Post

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

Next Post

मोठी बातमी | राज्यातील पोलीस संतापले.! रजा रोखीकरण रद्द केल्याने पोलीस दलात नाराजी, पोलिसांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला संताप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचाऱ्याचे निलंबन..!

मोठी बातमी | राज्यातील पोलीस संतापले.! रजा रोखीकरण रद्द केल्याने पोलीस दलात नाराजी, पोलिसांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला संताप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group