• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिरोळमधील स्टेट बँक शाखेची ४० लाखांची फसवणूक –

Admin by Admin
February 22, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
शिरोळमधील स्टेट बँक शाखेची ४० लाखांची फसवणूक –
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • म्हैसाळ येथील ठकसेन संशयित अशोक कोरवी पोलिसांच्या ताब्यात ; कोल्हापूर सह सांगली जिल्ह्यात आर्थिक फसवणूक केल्याची चर्चा

जयसिंगपूर प्रतिनिधी : सांगली जिल्हयातील म्हैशाळ ( ता. मिरज) येथील एका ठकसेनाने स्वतःची मिळकत आहे असे भासवून शिरोळ येथील स्टेट बँकेच्या शाखेला तारण देऊन चाळीस ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत स्टेट बँक शिरोळ शाखेचे शाखा अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी शिरोळ पोलिसात फिर्याद दिली आहे . दरम्यान , संशयित आरोपी अशोक मारुती कोरवी याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, म्हैशाळ येथील संशयित आरोपी अशोक मारुती कोरवी याने सिटी सर्व्हे नंबर २७३ मिळकत ही स्वतःची आहे असे बँकेला भासवले होते. त्याने सदरची मिळकत स्वतःच्या मालकीची नसताना शिरोळ स्टेट बँक शाखेला तारण देऊन ३९ लाख रुपयांचे कर्ज घेतले .सदर कर्जाची रक्कम २५ जुलै २०१९ रोजी बँकेच्या खात्यामधून उचलले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अशोक कोरवी यांनी कर्जाची रक्कम उचल केल्यानंतर आजअखेर कर्ज व त्यावरील व्याज रकमेची बँकेला परतफेड केलेली नाही. यामुळे सदरचे कर्ज थकीत झाले असल्याने या थकबाकीच्या रक्कम वसुलीबाबत शिरोळ स्टेट बँके शाखेने संबंधित कर्जदाराची पडताळणी केली असता संशयित आरोपी कोरवी यांनी बँकेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बुधवारी शिरोळ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ठकसेन संशयित आरोपी कोरवी याने शिरोळ तालुक्यातील पूर्व भागातील एका नामांकित पतसंस्थेलाही सदरची मिळकत तारण दाखवून कर्जापोटी लाखो रुपये उचलल्याची माहिती पुढे येत आहे . त्यामुळे ही संस्थाही आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता असून पोलिसांनी त्या संस्थेबरोबरच अन्य काही संस्थेमध्ये अशा प्रकारच्या फसवणूकीचा प्रकार झाला आहे का ? या दिशेने तपास सुरू केला आहे.

दरम्यान, कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात संशयित आरोपी कोरवी यांनी व्यक्तिगत तसेच सहकारी संस्थांना फसवणूक केल्याची चर्चा सुरू आहे. पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुल्ला अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

मिरजेत दोन मोबाईल चोरट्यांना अटक ; चोरीचे १७ मोबाईल हस्तगत

Next Post

सांगलीमधून १४० किलो ‘एमडी’ जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीमधून १४० किलो ‘एमडी’ जप्त

सांगलीमधून १४० किलो 'एमडी' जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group