• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आरटीआय कार्यकर्ता कदम खूनप्रकरणी दोघांना अटक

Admin by Admin
February 10, 2024
in क्राईम
1 min read
0
आरटीआय कार्यकर्ता कदम खूनप्रकरणी दोघांना अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम खूनप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री दोन संशयित युवकांना अटक केली आहे. महापालिकेत नोकरी लावण्यासाठी कदम याच्यासोबत संशयितांचा आर्थिक व्यवहार झाला होता.

यातूनच कदम याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. नीतेश दिलीप वराळे (वय 30) व सुरज प्रकाश जाधव (20, दोघे रा. सिद्धार्थ परिसर, सांगली) अशी समडोळी (ता. मिरज) येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तिसरा संशयित तुषार भिसे हा फरार असून त्याच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

संतोष कदम (वय 36, रा. गावभाग, सांगली) याचा धारदार चाकूने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह एका मोटारीत आढळून आला होता. खून करून हल्लेखोर मोटार रस्त्यावर सोडून पसार झाले होते.

संशयित नीतेश वराळेला सांगली महापालिकेत नोकरीस लावण्यासाठी संतोष कदमशी आर्थिक व्यवहार झाला होता. पण नोकरीचे काम न झाल्याने वराळेने कदमकडे पैशाचा तगादा लावला होता. यातूनच 10 ते 12 दिवसांपूर्वी दोघांच्यात वाद झाला होता. कदमने गुरुवारी पैसे देण्याचा वायदा केला होता. पण पैसे न दिल्याने तिघांनी चाकूने वर्मी घाव घालून कदमची हत्या केली आणि वाहनासह मृतदेह नांदणी रस्त्यावर सोडून तिघांनी पलायन केले, असे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी काही घटना आणि सांगली जिल्ह्यातील काही संशयित निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

कुपवाड बनतेय ‘हॉटस्पॉट’.? “तुला ईकडं रस्ता नाय का.? ईतनं रस्ता पेटलाय का.?” कुपवाडमध्ये नागरिकात दहशत : फाळकुट दादांचा वावर वाढला..!

Next Post

ब्रेकिंग | सांगलीतील संतोष कदम हत्या प्रकरणातील तिसऱ्या संशयित आरोपीला अटक.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

ब्रेकिंग | सांगलीतील संतोष कदम हत्या प्रकरणातील तिसऱ्या संशयित आरोपीला अटक.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group