• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाड बनतेय ‘हॉटस्पॉट’.? “तुला ईकडं रस्ता नाय का.? ईतनं रस्ता पेटलाय का.?” कुपवाडमध्ये नागरिकात दहशत : फाळकुट दादांचा वावर वाढला..!

Admin by Admin
February 10, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कुपवाड बनतेय ‘हॉटस्पॉट’.? “तुला ईकडं रस्ता नाय का.? ईतनं रस्ता पेटलाय का.?” कुपवाडमध्ये नागरिकात दहशत : फाळकुट दादांचा वावर वाढला..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • फाळकुट दादांना रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

क्राईम टाईम विशेष (प्रविण मिरजकर) – कुपवाड परिसराची शहरीकरणाच्या बाबतीत झपाट्याने वाढ होत आहे. आर्थिक दृष्ट्या व उद्योग धंद्यात वाढ होणे अपेक्षित असताना अशा रोजगारनिर्मिती, किंवा आर्थिक उलाढाल होण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागलाय. गुन्हेगार मात्र सुसाट वेगाने एकावर एक गुन्ह्यात वाढ करत सुटलेत. तर नव्या पोलीस अधीक्षकांच्या आगमनाने गुन्हेगारांच्यामध्ये दहशत असल्याचे ऐकायला मिळत असले तरी टोळ्यांच्या मात्र बैठकावर बैठका सुरू आहेत.

गल्लीबोळात दादागिरी करीत उनाडक्या करत फिरणाऱ्या फाळकुट दादांना ऊत आलाय.फाळकुट दादांचे वर्णन करायचे म्हणजे बुडाखाली दुचाकी/चारचाकी, तोंडात मावा धरून कुपवाडच्या चौका- चौकात गल्लीबोळातून माव्याच्या पिचकाऱ्या मारत टिंगल टवाळ्या करत, दहशत माजवत फिरणारे गुन्हेगारीचे प्राथमिक शिक्षण घेणारे युवक आहेत.

हे फाळकुट दादा सोसायटी चौकात, पाण्याची टाकी परिसर, आर पी पाटील हायस्कूलच्या मागे, कापसे प्लॉट चौक, बजरंग नगर, शरदनगर या भागात दहशत माजवण्याचे काम करत आहेत. कुपवाड मधील  पानपट्ट्यांच्या समोर आपली वाहने रस्त्याच्या मध्यभागी लावून, मावा चोळत सिगारेटचा झुरका मारीत धूर बाहेर फेकत, पानपट्टी समोर आपला रुबाब मारत बसलेले असतात. कुपवाड भागात विविध राज्यातून माल वाहतूक करणारे ट्रकसह इतर वाहने येतात. अवजड वाहने, चारचाकी, प्रवाशी वाहतूक गाड्या या वाहनांना रस्ता मिळत नसल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. या दैनंदिन त्रासाला नागरिक वैतागले असून फाळकुट दादांना रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असल्याने पोलीस काय भूमिका बजावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टवाळखोरी करणाऱ्या रोमियोंचा त्रास विद्यार्थी-विद्यार्थिनी यांसह कामगार महिला वर्ग यांना मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांचा रोष पोलिसांवर व्यक्त होत आहे. फाळकुटदादांना वेळीच लगाम घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र कुपवाड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील हे ॲक्शन घेणार आहेत की हे रोज असेच चालणार ? असा सवाल कुपवाडकर जनतेतून उठत आहे.

Previous Post

उमेद ‘सायझर्स’ला निर्यातीचे सलग १३ वे सुवर्णपदक

Next Post

आरटीआय कार्यकर्ता कदम खूनप्रकरणी दोघांना अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आरटीआय कार्यकर्ता कदम खूनप्रकरणी दोघांना अटक

आरटीआय कार्यकर्ता कदम खूनप्रकरणी दोघांना अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group