कुपवाड प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन- राज्यात वस्ञोद्योग निर्यात क्षेञात अग्रेसर असणा-या कुपवाड एमआयडीसीतील उमेद सायझर्स या कापड उत्पादन उद्योग समुहाला राज्य शासनाचा यंदाचाही सर्वोत्कृष्ट निर्यातदार गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. उमेद कंपनीला शासनातर्फे यापूर्वीही प्रत्येक वर्षी पुरस्कार मिळाले असून यंदाचा हा १३ वा पुरस्कार आहे. सदरचा पुरस्कार हा दि. ८ फेब्रुवारी रोजी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उमेद सायझर्सचे सतीश मालू, नितीन मालू यांना पुणे येथील टिप टॉप इंटरनॅशनल हॉटेल येथे प्रदान करण्यात आला. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षवर्धन कांबळे, विकास आयुक्त उदयोगचे दिपेंद्रसिंह कुशवाह, उद्योग सहसंचालक कोरबू, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक रजपूत, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्य्वस्थिका विद्या कुलकर्णी उपस्थित होते.
उमेद सायझर्स ला २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ असे चार वर्षाचे गोल्ड मेडल त्यांना झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आले. सदर कंपनी ही कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कंपनी असून सदर कंपनीत निर्यातीभुमिक कापडाचे उत्पादन केले जाते. सदर कंपनी ही आयएसओ ९००१-२०१५ आहे. सदर कंपनी ऑर्गनिक कॉटनचे कापडाचेही उत्पादन करणारी व क्रिसील रेटेड कंपनी सदरची कंपनीही केंद्र शासनाच्या ३ स्टार एक्सपोर्ट हाऊस मानांकन अशी कंपनी आहे. यापूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते निर्यातश्री पुरस्कारही मिळाला आहे.
यशस्वी गरूडझेप घेत उमेद समुहाने जिल्हयाच्या औद्योगिक जडणघडणीतही यशाचा मानाचा तुरा खोवला आहे.पुरस्काराची आनंदाची बातमी कळताच कंपनीतील कर्मचारी वर्गाने आंनदोत्सव साजरा केला. कर्मचा-यांनी उमेदच्या सर्व संचालकांचे कंपनीच्या प्रवेशद्वारात जल्लोषी स्वागत केले.
सदर कंपनी ही उमेद ग्रुपचे चेअरमन नेमीचंद मालू व मालू कुटुंबियाच्या मार्गदर्शनाखाली चालविली जाते. सदरच्या पुरस्काराचे श्रेय मालू कुटुंबीयांनी आपला स्टाफ व सर्व कामगारांना अर्पण केले आहे. कर्मचारी यांचे परिश्रम आणि एकोप्यामुळेच सदरचे यश मिळाले आहे असेही आवर्जून सांगितले.कामगारांचे परिश्रम, उत्कृष्ट नियोजनामुळेच कंपनीला यश मिळाले असून लवकरच उमेद ग्रुपचा पुढचा प्रोजेक्ट कुपवाड एमआयडीसीत होत असल्याचे मालू यांनी सांगितले.

