• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाड | भाई नेरुरकर राज्य खो-खो : किशोर-किशोरी गटात सांगली तर पुरुष-महिला गटात पुण्याला विजेतेपद

Admin by Admin
February 9, 2024
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कुपवाड | भाई नेरुरकर राज्य खो-खो : किशोर-किशोरी गटात सांगली तर पुरुष-महिला गटात पुण्याला विजेतेपद
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगली येथे झालेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत किशोर-किशोरी गटातील सामन्यांचा थरार सांगलीकर क्रिडाप्रेमींनी अनुभवला. त्यामध्ये यजमान सांगलीच्या संघानी दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली.

किशोरी गटात धाराशिव तर किशोर गटात ठाणे उपविजयी ठरले. पुरूष व महिला गटात पुण्याने दुहेरी विजेतेपद मान पटकावला तर महिलांमध्ये धाराशिव आणि पुरूषांमध्ये मुंबई उपनगरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, सांगली जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून कुपवाड येथील अकूज ड्रीमलेंड (ता. मिरज जि. सांगली) येथे कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील, भाजप नेते शेखर इनामदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, नगरसेवक गजानन मगदूम, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव अॅड. गोविंद शर्मा, क्रीडा विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सांगली जिल्हा खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष समीर शेख, सचिव प्रशांत इनामदार यांच्यासह अन्य मान्यवर पारितोषिक वितरणाला उपस्थित होते.

किशोर-किशोरी गटातील सामन्यांचा थरार –

अंतिम सामन्यांचा थरार पाहण्यासाठी हजारो सांगलीकर उपस्थित होते. त्यांची अपेक्षाही किशोर-किशोरी गटातील खेळाडूंनी पूर्ण केली. किशोरींच्या अंतिम सामन्यात यजमान सांगलीने धाराशिवचा (२५-२२) ३ गुणांनी पराभव करत स्पर्धेतील विजेतेपद पटकावले. आरंभीला दोन्ही संघांचे गुण (१५-१५) समान झाल्यामुळे जादा डाव खेळवण्यात आला. या डावातील आक्रमणात सांगलीने १० गुण मिळवले. धाराशिवला आक्रमणात ७ गुणच मिळवता आले. त्यामुळे या सामन्यात सांगली संघ विजयी ठरला. सांगलीकडून वैष्णवी चाफे हिने (१ मि., १.२० मि. संरक्षण व ७ गुण), सुवर्णा तामखडे (१.३०, २, २ मि. संरक्षण व २ गुण), पायल तामखडे (१, १. मि. संरक्षण व ७ गुण) असा खेळ करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर धाराशिवकडून मैथिली पवार (१.२०, २.३० मि., १.२० मि. संरक्षण व ७ गुण), मुग्धा वीर (१.१० संरक्षण व ६ गुण), सिद्धी भोसले (१.५० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी चांगला खेळ करत सामन्यात रंगत आणली.

किशोर गटात सांगलीने ठाण्याचा लघुत्तम आक्रमणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात पराभव करच कै. भाई नेरूरकर राज्यस्तरीय स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. जादा डावात समान गुण झाल्यामुळे लघुत्तम आक्रमणाचा डाव खेळवण्यात आला. त्यामध्ये सांगलीने विजय मिळवला. चुरशीच्या सामन्यात सांगलीकडून रितेश भालदार (१.३०,१.५० व १ मि. संरक्षण व ४ गुण), संग्राम डोबळे (२, १, ३ मि. संरक्षण), श्री दळवी (१, २.२० व १.३० संरक्षण व ३ गुण) असा खेळ केला. ठाण्याकडून खेळताना ओंकार सावंत (२,,२, २.२० मि संरक्षण व ३ गुण), अमन गुप्ता (३.४०, २.३०, २ मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.

महिला गटात पुण्याने धाराशिवला (११-१०) ४.१० मिनिटे राखून १ गुणांने मात केली. पुण्याकडून प्रियांका इंगळे (२.४०, २.१० मि. संरक्षण व ४ गुण), कोमल धारवाडकर (२, १ मि. संरक्षण), काजल भोर (१.३० व नाबाद १ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी पुण्याच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. धाराशिवकडून सुहानी धोत्रे (४ गुण), अश्विनी शिंदे (२, ३ मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.

पुरूष गटात अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरवर (२०-१०) १० गुणांनी सहज मात केली. या विजयात पुण्याकडून खेळताना आदित्य गणपुले (२.३०, १.१० मि. संरक्षण व ५ गुण), शुभम थोरात (२.४० मि. संरक्षण), सुयश गरगटे (२, १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी मोलाची कामगिरी केली. मुंबई उपनगरकडून अनिकेत चेंदणकर (१.५०, १, १.४० मि. संरक्षण व १ गुण), ऋषिकेश मुरचावडे (१.३०, १.४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी चांगला खेळ केला.

Previous Post

MURDER – sangli RTI member | रक्तबंबाळ अवस्थेत कारमध्ये आढळला मृतदेह, सांगलीतील आरटीआय कार्यकर्ते संतोष कदमचा खून..!

Next Post

उमेद ‘सायझर्स’ला निर्यातीचे सलग १३ वे सुवर्णपदक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
उमेद ‘सायझर्स’ला निर्यातीचे सलग १३ वे सुवर्णपदक

उमेद 'सायझर्स'ला निर्यातीचे सलग १३ वे सुवर्णपदक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group