• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | उपमुख्यमंत्री पवार उद्या जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात

Admin by Admin
February 4, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
मौलाना आझाद महामंडळाला निधी देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : पक्ष कार्यालयाचे उद्धाटन करण्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या इस्लामपूरमध्ये सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी येत आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांची राजकीय कोंडी करण्याचे निश्‍चित केल्याचे यावरून दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळा गट स्थापन करून अजित पवार थेट सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आमदार पाटील यांनी खा. शरद पवार यांच्यासोबत राहून या गटाची धुरा सांभाळली असताना त्यांचे महत्वाचे साथीदार अजितदादा गटात सामील झाले आहेत. महापालिका क्षेत्रातील चार माजी महापौरासह काही माजी नगरसेवकही दादा गटात सहभागी झाले आहेत, तर काही माजी नगरसेवक या वाटेवर आहेत.

या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सांगली दौर्‍यावर पहिल्यांदाच येत आहेत. जिल्ह्यात आगमन होताच इस्लामपूरमध्ये केदार पाटील यांच्या प्रस्तावित राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने आमदार पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच आव्हान देण्याचा उपमुख्यमंत्री पवार यांचा हेतू असल्याचे मानले जात आहे.

उपमुख्यमंत्री पवार इस्लामपूरमध्ये कार्यालय उद्घाटन झाल्यानंतर विटा येथे स्व. अनिल बाबर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार असून विट्यात ते पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. यानंतर सायंकाळी सांगलीमध्ये पुरूष कबड्डी निवड चाचणी स्पर्धेला भेट देउन कुपवाडमध्ये खो-खो स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Previous Post

कुपवाडमध्ये उद्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते स्व. मदन भाऊ पाटील स्टेडियमचे लोकार्पण..!

Next Post

सांगली ब्रेकिंग | विक्रीच्या प्रयत्नात असताना तीन देशी पिस्तूल जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | विक्रीच्या प्रयत्नात असताना तीन देशी पिस्तूल जप्त

सांगली ब्रेकिंग | विक्रीच्या प्रयत्नात असताना तीन देशी पिस्तूल जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group