कुपवाड प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – कुपवाड येथे महानगरपालिकेच्या माध्यमातून खो-खो, कबड्डी, कुस्ती, अशा देशी खेळांना प्राधान्य देण्याकरिता स्व. मदन भाऊ पाटील स्टेडियम हे नगरसेवक गजानन मगदूम यांच्या विशेष प्रयत्नातून सुसज्ज व सर्व सोयीनियुक्त स्टेडियम बांधण्यात आले आहे. कुपवाड शहरातील पहिले सुसज्ज स्टेडियम प्रेक्षक गॅलरीसह पूर्ण झाले आहे. यासाठी आ. सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील यांनी आवश्यक निधी देऊन विशेष सहकार्य केले आहे.
उद्या दि. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० वाजता रुमालेनगर मिरज रोड, कुपवाड येथे लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर दादा गाडगीळ, भाजप नेते शेखर इनामदार, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीवहिनी पाटील, पद्माकर जगदाळे, आयुक्त सुनील पवार तसेच महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी, माजी पदाधिकारी व माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती गजानन मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, पद्माकर जगदाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ प्रशांत इनामदार, शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील,ठेकेदार संदीप पाटील, भाऊसाहेब पाटील, दादासो पाटील, सी आर पाटील, हणमंत सरगर, नितीन कारंडे, योगेश हिंगमीरे,विनायक रासकर यांच्यासह अनेक मान्यवर,सदस्य उपस्थित होते.

