• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडमध्ये ५ फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचा थरार

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Admin by Admin
February 4, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमध्ये ५ फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचा थरार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आयोजित कै. भाई नेरुरकर चषक राज्य स्तरीय खो-खो स्पर्धा सांगली जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय व द ॲम्यचुर खो खो असोसिएशन सांगली जिल्हा यांच्या नियंत्रणाखाली शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुपवाड यांच्या नियोजनाखाली दि.०५ ते ०८ फेब्रुवारी २०२४ रोजी अकुज ड्रिमलॅन्ड, कुपवाड येथे होणार आहेत. या स्पर्धेमध्ये दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून क्रमवारी प्राप्त संघांचा समावेश होतो. यामध्ये पुरुष व महिला गटाचे प्रत्येकी १२ संघ व किशोर – किशोरी गटाचे प्रत्येकी ८ संघ असे एकूण ४० संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धेमध्ये एकूण रक्कम २,६३४०००/- तसेच कै.भाई नेरूरकर चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कुपवाड येथे चार क्रीडांगणे तयार करण्यात आली असून प्रेक्षकांना स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. स्पर्धा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या तांत्रिक समिती व पंचमंडळाच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहेत. खेळाडूंना निवासाची व भोजनाची व स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.

यावेळी जिल्ह्यातील खासदार व सर्व आमदार व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांचे नेतृत्वाखाली विविध समित्या कार्य करीत असून स्पर्धेचे स्वागत अध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ व स्पर्धेचे निमंत्रक गजानन मगदूम यांनी पत्रकार परिषदेत स्पर्धेच्या तयारीची व उद्घाटन समारंभाची माहिती दिली. यावेळी स्पर्धेचे आयोजन समितीचे सदस्य शेखर इनामदार, पद्माकर जगदाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा, जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ प्रशांत इनामदार, शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, दादासो पाटील, भाऊसाहेब पाटील, विजय खोत, अरुण रुपनर, बाळासाहेब मंगसुळे, सी आर पाटील, आशुतोष धोतरे, प्रशांत पवार, नितीन कारंडे, योगेश हिंगमीरे गणेश कारंडे क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा खो-खो असोसिएशन व शिवप्रेमी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

“कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेला महाराष्ट्र..”, भाजपा नेत्याने शिंदे गटाच्या नेत्यावर केलेल्या गोळीबारानंतर काँग्रेसची टीका

Next Post

कुपवाडमध्ये उद्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते स्व. मदन भाऊ पाटील स्टेडियमचे लोकार्पण..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमध्ये उद्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते स्व. मदन भाऊ पाटील स्टेडियमचे लोकार्पण..!

कुपवाडमध्ये उद्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते स्व. मदन भाऊ पाटील स्टेडियमचे लोकार्पण..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group