• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे अमिष दाखवून फसवणूक; सांगली जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांवर गुन्हा

Admin by Admin
January 8, 2024
in क्राईम
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कराड प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाला तब्बल ९० लाख रुपयांचा गंडा घातला गेला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोन सख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद कराडच्या मंगळवार पेठेतील सुरज विष्णू साळुंखे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार नवीनकुमार सावंत व महेशकुमार सावंत ( दोघेही रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरज साळुंखे हे चांदीचा व्यवसाय करतात. व्यवसायानिमित्त ते आंध्रप्रदेशमध्ये गेले असता त्यांची तिथे भिकवडी येथील नवीन सावंत याच्याशी ओळख झाली. त्यानंतर नवीनने सुरज यांना कराडमध्ये दुकान सुरू करणार असल्याचे सांगून पैशाची मागणी केली. तसेच भागीदारीत व्यवसाय सुरू करू, असेही सांगितले.

सुरज यांनी या प्रस्तावाबाबत नवीनचा भाऊ महेश याच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर सोन्याचे दागिने गहाण ठेवून १५ लाख, तसेच स्वत:जवळील १५ लाख असे ३० लाख रुपये सुरज यांनी नवीनला दिले. १६ जानेवारी २०२२ रोजी हा व्यवहार झाला. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये महेश व नवीन दोघेही सुरज यांच्या कराडमधील दुकानात आले. त्यावेळी सुरज यांनी चांदीबाबत विचारणा केली. मात्र, चांदीसाठी आणखी १० लाख रुपयांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार सुरज यांनी १० लाख रुपये दिले. त्याबरोबरच जास्तीत जास्त चांदी आणायची असेल, तर आणखी ३० लाख रुपयांची जुळणी कर, असेही त्या दोघांनी सांगितले. त्यामुळे सुरज यांनी त्यांच्या मित्राकडून आणखी ३० लाख रुपये घेऊन नवीन आणि महेशला दिले. त्यानंतर आणखी १० लाख रुपये नवीनच्या बँक खात्यावर भरण्यात आले.

दि. ६ सप्टेंबर २०२१ पासून आज अखेर सुरज साळुंखे यांनी नवीन व त्याचा भाऊ महेश या दोघांना एकूण ९० लाख रुपये दिले. मात्र, एवढे पैसे देऊनही त्या दोघांनी सुरज यांना चांदी आणून दिली नाही. तसेच भागीदारीत व्यवसायही सुरू केला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सुरज साळुंखे यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करत आहेत.

Previous Post

धक्कादायक | सांगलीजवळ कार थेट कृष्णा नदीच्या पात्रात कोसळली : बघ्यांची गर्दी – दोघेजण बचावले – उपचार सुरू.

Next Post

मोठी बातमी – केंद्रीय मंत्री Amit Shah पोहोचले मुंबईच्या रुग्णालयात, CM Eknath Shinde ही आले भेटीसाठी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
रेल्वेचा दोन दिवस मेगाब्लॉक; काही ट्रेन रद्द : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍सप्रेसचाही समावेश : वाचा सविस्तर

मोठी बातमी - केंद्रीय मंत्री Amit Shah पोहोचले मुंबईच्या रुग्णालयात, CM Eknath Shinde ही आले भेटीसाठी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group