• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक | सांगलीजवळ कार थेट कृष्णा नदीच्या पात्रात कोसळली : बघ्यांची गर्दी – दोघेजण बचावले – उपचार सुरू.

Admin by Admin
January 8, 2024
in क्राईम
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – कोल्हापूर- सांगली महामार्गावरील उदगाव (ता.शिरोळ) गावच्या हद्दीत कृष्णा नदीवरील पुलावरून भरधाव कार संरक्षक कठडे तोडून खाली कोसळली. रविवारी (ता.७) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. दुर्घटनेतील दोघा जखमींवर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उदगाव येथील कृष्णा नदीवरील पुलावरून चारचाकी वाहन सांगलीकडे जात होते. यावेळी वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने कृष्णा नदीच्या पुलाचा कठडा तोडून चारचाकी कृष्णा नदीच्या पात्रात कोसळली. वाहन कोसळल्यानंतर वाहनातील एअर बॅग खुली झाल्याने सुदैवाने दोघांचा जीव वाचला. अहमदनगर येथील दोघे यात जखमी झाले. घटनास्थळी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉ. नीता माने यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. त्यांनतर शासकीय रुग्णवाहिकेतून सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातामुळे सांगली- कोल्हापूर महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, २०१६ साली अशा प्रकारचा व याचठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी वाहन पुलाच्या कठड्याच्या टोकावर अंतराळी अडकले होते. अशाच प्रकारे आज अपघात झाल्याने ‘त्या’ अपघाताची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Previous Post

७ जानेवारीला आमनापुरात महारक्तदान शिबिर

Next Post

भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे अमिष दाखवून फसवणूक; सांगली जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांवर गुन्हा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे अमिष दाखवून फसवणूक; सांगली जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांवर गुन्हा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group