• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी – केंद्रीय मंत्री Amit Shah पोहोचले मुंबईच्या रुग्णालयात, CM Eknath Shinde ही आले भेटीसाठी

Admin by Admin
January 8, 2024
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
रेल्वेचा दोन दिवस मेगाब्लॉक; काही ट्रेन रद्द : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍सप्रेसचाही समावेश : वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल रविवारी (ता. ०७ जानेवारी) मुंबईत आल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह हे काल रात्री मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी थेट एचएन रिलायन्स रुग्णालय गाठले.

या रुग्णालयात अमित शाहांची बहिण उपचार घेत असल्याची माहिती असून त्यांची विचारपूस करण्यासाठीच ते मुंबईत आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा हा खासगी दौरा होता. ज्यामुळे त्यांनी कोणाचीही भेट घेतली नाही, तर केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुग्णालयात दाखल झाले होते. अमित शाह हे रुग्णालयात आल्याने त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

गोपनीय खबऱ्याला मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री अमित शाह हे काल रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास अचानक मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी थेट मुंबईतील प्रतिष्ठित असे एचएन रिलायन्स रुग्णालय गाठले. ज्या ठिकाणी शाहांची बहिण उपचार घेत आहे. यावेळी ते बराच वेळ या रुग्णालयात होते. त्यांनी बहिणीची विचारपूस केली, त्यानंतर त्यांनी डॉक्टरांशी देखील त्यांच्या बहिणीवर सुरू असलेल्या उपचाराची चर्चा केल्याची माहिती आहे. अमित शाह यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक सुद्धा उपस्थित होते. तर साधारणतः पावणे दोन तास यावेळी रुग्णालयात उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमित शाह यांचा हा पूर्णतः खासगी दौरा होता. ज्यामुळे त्यांनी कोणत्याही नेत्याची भेट घेतली नाही. याशिवाय त्यांनी कोणतीही बैठक घेतली नाही. केवळ बहिणीच्या तब्येतीची विचारपूस करून ते पुन्हा दिल्लीला रवाना झाले. मात्र, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुग्णालयात पोहोचल्याची माहिती समोर आली. अमित शाह मुंबईत आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. मुख्यमंत्री शिंदेही 15 ते 20 मिनिटे रुग्णालयात होते. त्यांनीही शाह यांच्या बहिणीची भेट घेऊन विचारपूस केली. शिंदे यांनी डॉक्टरांशीही चर्चा करून उपचाराची माहिती घेतली. याचवेळी उद्योगपती मुकेश अंबानी सुद्धा रुग्णालयात उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अमित शाह मुंबईत आल्याचं कळताच रुग्णालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रुग्णालयात धाव घेतली होती. अमित शाह हे त्यांच्या खासगी कामासाठी मुंबईत आल्याने रुग्णालयाबाहेर गर्दी होऊ नये, किंवा अन्य कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली होती.

Previous Post

भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे अमिष दाखवून फसवणूक; सांगली जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांवर गुन्हा

Next Post

मिरजेतील रेल्वे पुलाबाबतीत ‘हा’ निर्णय..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील रेल्वे पुलाबाबतीत ‘हा’ निर्णय..!

मिरजेतील रेल्वे पुलाबाबतीत 'हा' निर्णय..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group