• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘मराठी’ पाटी न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा : तानाजी सावंत

Admin by Admin
January 6, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
‘मराठी’ पाटी न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा : तानाजी सावंत
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • मनसे आक्रमक : आयुक्तांना दिले निवेदन
  • मराठी भाषेला दिले जाणारे दुय्यम स्थान खपवून घेतले जाणार नाही – तानाजी सावंत

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | दुकानांवर सक्तीने मराठी पाट्या लावण्याची मागणी मनसे कडून करण्यात आली. यासंदर्भात महापालिका आयुक्त सुनील पवार व मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये सरकारी नियमाची पायमल्ली करणाऱ्या व न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या महापालिका क्षेत्रातील अनेक दुकाने व आस्थापना ज्यांचे नामफलक मराठी भाषेत नाहीत तसेच मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात आहे अशा दुकाने आणि अस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्याविषयी चर्चा करण्यात आली. याबाबत आयुक्तांनी उद्या पासूनच मोहीम राबवणार असल्याचे सांगून ज्या आस्थापना आणि दुकानावर मराठी भाषेतील नामफलक नाहीत व मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले आहे अशा व्यावसायिकांना नोटीस बजावून कायदेशीर, दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

यावेळी तानाजीराव सावंत यांनी आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, मराठी पाट्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना वारंवार पाठपुरावा करत आहे. या विषयी मागील काही दिवसांपूर्वी आम्ही आंदोलन देखील केले होते. परंतु काही व्यावसायिक मराठी भाषेचा जाणीवपूर्वक अवमान करत आहेत. प्रादेशिक भाषा व प्रांतरचना आपल्या देशात करण्यात आली आहे. मग प्रादेशिक अस्मिता टिकवायची व जपायची जबाबदारी कोणाची? भारत देशाला प्राचीन काळापासून धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. जगाच्या इतिहासात भारतीय संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. भारत देश हा विविध भाषा आणि संस्कृतीने नटलेला आहे. त्याच विविध भाष्यांमध्ये अग्रस्थानी असलेली मराठी भाषा व संस्कृती ही जगभरात ओळखली जाते. परंतु खेदजनक बाब ही आहे, की आपल्याच महाराष्ट्रात मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात आहे.

काही व्यावसायिकांना मराठी भाषेत नामफलक लावायला कमीपणा वाटत आहे. आणि आम्हाला कधीही हे मान्य नाही. महाराष्ट्रात मराठी भाषेला प्रथम स्थान मिळालेच पाहिजे. कायदेशीर कारवाई करून देखील जर सरसकट दुकानांचे मराठी भाषेत नामफलक झाले नाहीत, तर मात्र अशा व्यावसायिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोष्याला सामोरे जावे लागेल.

यावेळी दयानंद मलपे, विठ्ठल शिंगाडे, अमर औरादे, अनिकेत कुंभार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

मोठी बातमी ! भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावणे भोवलं

Next Post

७ जानेवारीला आमनापुरात महारक्तदान शिबिर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
७ जानेवारीला आमनापुरात महारक्तदान शिबिर

७ जानेवारीला आमनापुरात महारक्तदान शिबिर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group