कोल्हापूर प्रतिनिधी – खबऱ्या ऑनलाईन | छत्रपती मालोजीराजे व राणी सरकार मधुरिमाराजे यांच्याकडून कर्नाटक मधील सौंदत्ती येथे देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांना परंपरागत वीस वर्षे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाही महप्रसादाची व्यवस्था घटप्रभा कॅम्पस या ठिकाणी केली होती. तब्बल पाच हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी राणी सरकार सौ श्रीमंत मधुरिमाराजे,श्रीमंत यशराजे यांच्या हस्ते देवीची पूजा करून महाप्रसाद भोजनाचे वाटप करण्यात आले. राजे फौडेशनचे अध्यक्ष रियाज जैनापुरे,रशिद सय्यद,संग्राम पाटील, संजीव भालेकर,शितल चौगुले,उमा पाटील, स्वरूपा खुरंदळे,संदीप चौगुले,गणेश शिंदे यांनी पुढाकार घेत याचे आयोजन केले होते.


