• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडमधील नामांकित शिक्षण संस्थेत “मेजर प्रॉब्लेम”.? विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची जोरदार चर्चा..!

Admin by Admin
December 21, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, शैक्षणिक, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमधील नामांकित शिक्षण संस्थेत “मेजर प्रॉब्लेम”.? विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची जोरदार चर्चा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – कुपवाड एमआयडीसीतील नामवंत शिक्षण संस्थेच्या भानगडींची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. काही दिवसांपूर्वी प्रसिध्दी माध्यमांची किंमत केवळ २०० रुपये केली होती. यावेळी काही जागृत बातमीदार आपला स्वाभिमान असल्याने शिक्षण संस्थेच्यावतीने वाटण्यात आलेली मिठाई धुडकावून आले होते.तर चोळ्याची भूमिका घेणारे लाळचाटू रसमलाई चाटत होते. याच प्रकरणात जोशी बुवांनी आपल्या बिनशेंड्याच्या नकट्या जिभेने मम: म्हणत काहींच्या जिभेचे चोचले पुरवले होते तर काहींचे घसे ओले केले होते.

असो, मुद्यावर येवून बोलू, ज्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना जबर मारले त्यांच्या वेदना पोलीस ठाण्यात प्रकरण गेल्यावर थांबल्या..? हे कोणी सांगितले. मुळात “मेजर प्रॉब्लेम” झाल्यानंतर म्हणजेच विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर संस्थेची बदनामी होईल या भीतीने पडदा टाकणार असाल आणि चिमुकल्यांचा तळतळाट घेणार असाल तर बिनधास्त घ्या..! पण या पापात पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि जागृत असलेल्या पालकांना सहभागी करून घेऊ नका. झालेल्या घटनेची पोलीस ठाण्याच्या “स्टेशन डायरी”ला नोंद असल्याचीही माहिती मिळत आहे.

हाथ जोडले, पाया पडले, प्रकरण मिटले, तुम्ही कशाला वाढवता..? असे एक ना अनेक प्रश्न करीत “मास्तर” फिरत होते. पण मास्तर, पोलीस कर्मचारी हे डायरी घेवून नोंद घालायला तुमच्याकडे आले होते का..? तुम्हीच प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या जागेची निवड केली ना..? असा थेट सवाल कुपवाडकर व पालकवर्ग विचारत आहेत.

या जबर मारहाणीत एका विद्यार्थ्याचे डोके फुटले तर सात ते आठ मुले जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.या बेदम मारहाणीनंतर पालकांनी पोलीस ठाणे गाठले. गुन्हा दाखल न करता “मेजर प्रॉब्लेम” करणाऱ्या त्या मास्तरला कामावरून काढून टाकल्याची अन् उद्यापासून कामावर येऊ देणार नसल्याची तंबी संस्थेकडून मास्तरला देण्यात आली. शाळेचे नाव खराब होते म्हणून अनेक दिग्गज हे प्रकरण मिटवण्यासाठी सरसावले होते.

बुवांनी तर चक्क लोटांगण घातलं असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याबाबत सविस्तर वृत्त आणि प्रकरणाचा लेखाजोखा लवकरच गोपनीय खबऱ्याकडून मांडण्यात येईल. ( क्रमशः)

Previous Post

वाहतूक नियमांचे उल्लंघन; सांगली जिल्ह्यात १५ दिवसांत पोलिसांनी वसूल केला “इतक्या लाखांचा” दंड

Next Post

सांगली ब्रेकिंग | कोरोनाचे दोन रूग्ण आढळले..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

सांगली ब्रेकिंग | कोरोनाचे दोन रूग्ण आढळले..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group