• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | कोरोनाचे दोन रूग्ण आढळले..!

Admin by Admin
December 21, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्ण आढळले असून, शहरातील विश्रामबाग परिसरात दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटबाबत चर्चा सुरू असतानाच सांगलीतही रूग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

शहरातील पती-पत्नीचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर १४ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने बैठक घेत उपचाराबाबत नियोजन केले आहे.

देशात कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली हाेती. राज्यातीलही काही भागात कोरोना रूग्ण आढळत होते. त्यानुसार महापालिका क्षेत्रात गुरूवारपासून चाचणी सुरू करण्यात आली. यात दोघे कोरोनाबाधित आढळले. सर्दी, ताप असल्याने त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यांची प्रकृती चांगली आहे. रूग्णाच्या पत्नीची चाचणीही पॉझिटिव्ह आली असलीतरी कोणतीही लक्षणे नाहीत. दोन महिन्यांपूर्वी महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्ण आढळला होता.

सांगलीत आढळलेल्या दोन रूग्णांना कोणत्या व्हेरीयंटचा कोरोना आहे याच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार आहेत.

दरम्यान, गुरूवारी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुपारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीतही याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली.

  • मास्कचा वापर करा..

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले की, देश आणि राज्यात वाढत चाललेल्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी आठवडी बाजार, मॉल्स, लग्न समारंभात जाताना मास्कचा वापर करावा. कोरोना बचावासाठीचे नियमांचे पालन करावे. जर कोणाला लक्षणे आढळल्यास त्यांनी तपासणी करून घ्यावी.

Previous Post

कुपवाडमधील नामांकित शिक्षण संस्थेत “मेजर प्रॉब्लेम”.? विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची जोरदार चर्चा..!

Next Post

जिवंत काडतुसासह पाच अग्निशस्त्रे जप्त, तरुणाला अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
इचलकरंजीत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन : डॉ. प्रतिभा पैलवान

जिवंत काडतुसासह पाच अग्निशस्त्रे जप्त, तरुणाला अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group