• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वाहतूक नियमांचे उल्लंघन; सांगली जिल्ह्यात १५ दिवसांत पोलिसांनी वसूल केला “इतक्या लाखांचा” दंड

Admin by Admin
December 21, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
वाहतूक नियमांचे उल्लंघन; सांगली जिल्ह्यात १५ दिवसांत पोलिसांनी वसूल केला “इतक्या लाखांचा” दंड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत त्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर आता पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत. ‘ई-चालान’द्वारे करण्यात येणारा दंड न भरता त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचेही प्रमाण वाढले होते.

यासाठी वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत १५ दिवसांत ५३ लाख ९६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर ई-चालान डिव्हाइसद्वारे दंड करण्यात येतो. ई- चालानाद्वारे करण्यात येणारा दंड न भरणाऱ्यांवरही प्रसंगी गुन्हा दाखल करण्याची तयारी करण्यात आली आहे. तत्पूर्वी लोक अदालतीमध्ये हजर राहण्यासाठी नोटीस पाठविण्यात आल्या होत्या.

त्यानुसार जिल्ह्यातील ७ हजार २०९ वाहनधारकांकडून ५३ लाख ८६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ज्या वाहनधारकांनी न्यायालयाची नोटीस येऊनही दंड भरला नाही त्यांच्यावर न्यायालयात खटले दाखल करण्याची कार्यवाही सध्या सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे वाहनधारकांनी आपला प्रलंबित दंड जवळच्या वाहतूक शाखेत भरावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले आहे. २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत दंडाची रक्कम भरणा करण्यासाठी सर्व ठिकाणी विशेष माेहीम राबविण्यात येणार आहे. तरी प्रलंबित दंड तत्काळ भरण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

पुणे हादरलं ! अल्पवयीन कर्णबधिर बहिणीवर भावासह तिघांकडून बलात्कार..

Next Post

कुपवाडमधील नामांकित शिक्षण संस्थेत “मेजर प्रॉब्लेम”.? विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची जोरदार चर्चा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमधील नामांकित शिक्षण संस्थेत “मेजर प्रॉब्लेम”.? विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची जोरदार चर्चा..!

कुपवाडमधील नामांकित शिक्षण संस्थेत "मेजर प्रॉब्लेम".? विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची जोरदार चर्चा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group