• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खाऊचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलीवर बलात्कार, तिघे अल्पवयीन ताब्यात..

Admin by Admin
December 16, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
इचलकरंजीत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन : डॉ. प्रतिभा पैलवान
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | शाळा सुटल्यावर घराकडे जात असताना खाऊचे आमिष दाखवून सात वर्षीय बालिकेवर तिघा अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार जत तालुक्यातील एका गावात समाेर आला आहे. ही घटना गुरुवार दि.१४ राेजी सायंकाळी घडली. तीनही अल्पवयीन मुलांना शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित बालिका गावापासून चार किलाेमीटर अंतरावर असलेल्या वस्तीवर राहते. ती दररोज चालत शाळेत जाते. जवळच्या वस्तीवर असलेली १२, १४ व १६ वर्षाची तीन मुलेही तिच्याच शाळेत शिकतात. सर्वजण नेहमी एकत्रच शाळेत जात-येत असत. गुरुवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर या तीन मुलांनी पीडित मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवत रस्त्याच्याकडेला असलेल्या ओहळीत नेले. तिच्यावर बलात्कार केला. रात्री वेदना झाल्याने तिने आईला आपल्याला त्रास हाेत असल्याचे सांगितले. त्यानंतर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती. संबंधित तीनही अल्पवयीन मुलांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तिघेही अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेण्याच्या तसेच बाल सुधारगृहात रवाना करण्याच्या हालचाली सुरू होत्या. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Previous Post

‘एलसीबी’चे ग्रहण सुटणार कधी ?

Next Post

वडिये रायबाग भगत मळा रस्त्यावर अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

वडिये रायबाग भगत मळा रस्त्यावर अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group