• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, ५ जणांच्या टोळीला अटक

Admin by Admin
December 15, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, ५ जणांच्या टोळीला अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन |™येथे वनविभागाने कारवाई करून व्हेल माशाची उल्टीची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ ग्रॅम उलटीचा नमुना , पाच मोबाईल , दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून याचे मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदर घटना शुक्रवारी (दि.१५) दुपारी चार च्या दरम्यान घडली. रोहन सर्जेराव पाटील (वय २९ रा. कोनवडे ता. भुदरगड जि. कोल्हापूर) प्रथमेश सुरेश मोरे (वय २३ वर्षे रा.सोळंबी , ता.राधानगरी, जि. कोल्हापूर) दिग्विजय उत्तम पाटील (वय २४ रा.सागाव, ता.शिराळा, जि. सांगली ) लक्ष्मण सुखदेव सावळे ( वय ३४ रा.लातूर सध्या रा. कळंबोली मुंबई ) दत्तात्रय आनंदराव पाटील ( वय वर्षे ४१ रा. बिऊर ता. शिराळा, जि. सांगली) असे संशयितांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की , सागांव येथील पेट्रोल पंपावर बनावट ग्राहक बनून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गेले होते. यावेळी संशयित दत्तात्रय आनंदराव पाटील हा ग्राहकांची भेट घेऊन व्हेल माशाची उल्टीचा नमुना दाखविण्यासाठी आणतो म्हणून गेला. अर्ध्या तासाने दत्तात्रय पाटील हा रोहन सर्जेराव पाटील ,प्रथमेश सुरेश मोरे दिग्विजय उत्तम पाटील लक्ष्मण सुखदेव सावळे , दत्तात्रय आनंदराव पाटील असे पाच पेट्रोल पंपावर आले.त्यांनी बॅगेमध्ये असलेला व्हेल माशाची उल्टी (Ambergris) दाखवली. याबाबत आपण बऱ्याच व्यवहारात फसवणूक झाली आहे त्यामुळे संपूर्ण मुद्देमाल पाहिल्यावरच व्यवहार करूया असे सांगितले.

यावेळी उपस्थित वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक डॉ.अजित साजने , मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांचे समवेत पेट्रोलियम पंपावरती सापळा रचून वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, अनिल वाजे, हणमंत प्र. पाटील, विशाल डुबल, भिवा कोळेकर, रजनिकांत दरेकर, बाबासो गायकवाड , मोहन सुतार यांनी संशयित पाच जणांना ताब्यात घेतले.

Previous Post

पाच लाखापोटी ४० लाख वसूल, कृषी सहायक महिलेसह पतीवर सावकारीचा गुन्हा

Next Post

मिरज | तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू ; एकजण जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पत्नीचा छळ; सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा

मिरज | तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू ; एकजण जखमी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group