• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पाच लाखापोटी ४० लाख वसूल, कृषी सहायक महिलेसह पतीवर सावकारीचा गुन्हा

Admin by Admin
December 15, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
इचलकरंजीत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन : डॉ. प्रतिभा पैलवान
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तासगाव प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | पाच लाखाच्या मुद्दलाच्या बदल्यात चाळीस लाख रुपयाचा मोबदला घेऊन आणखी एक कोटी २० लाख रुपयांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे महात्माजी निवृत्ती निकम (वय ५५, रा.हातनोली) यांनी सहा डिसेंबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

आठ दिवसानंतर त्यांची तब्येत ठिक झाल्यावर त्यांनी खासगी सावकारकी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कृषी विभागात कृषी सहायक म्हणून कार्यरत असणारी श्रद्धा शिवाजी जाधव आणि तिचा पती शिवाजी नारायण जाधव ( रा. हातनोली) यांच्या विरोधात तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी महात्माजी निवृत्ती निकम यांचा ज्वेलरीचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसाय निमित्त पाच लाख रुपयांची रोख रक्कम श्रद्धा जाधव आणि शिवाजी जाधव यांच्याकडून घेतली होती. या दोघांनी २० टक्के दरमहा सावकारी व चक्रवाढ व्याजाने आकारणी करून पाच लाखाच्या मोबदल्यात ४० लाख रुपये परत घेतले. त्यानंतर आणखी एक कोटी २० लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी सातत्याने तगादा लावला. पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली.

या गोष्टीला कंटाळून महात्माजी निकम यांनी सहा डिसेंबरला आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर आठ दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी याबाबत तासगाव पोलिसात खासगी सावकारकी आणि आत्महत्येस प्रवृत्त गेल्याप्रकरणी, श्रद्धा जाधव आणि शिवाजी जाधव या पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. श्रद्धा जाधव ही तासगाव कृषी विभागाकडे कवठे एकंद येथे कृषी सहायक म्हणून कार्यरत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव तारडे करत आहेत.

Previous Post

सांगली | ५०० रुपयांच्या बनावट नोटा खात्यात भरल्या, सांगली शहर पोलिसांकडून तिघे ताब्यात

Next Post

सांगली | व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, ५ जणांच्या टोळीला अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, ५ जणांच्या टोळीला अटक

सांगली | व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, ५ जणांच्या टोळीला अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group