सांगोला प्रतिनिधी | विकास गंगणे | खबऱ्या ऑनलाईन- आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकून हल्ला केल्याच्या निषेधार्थ शनिवारी दि १६ रोजी सांगोला बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन सांगोला तालुक्यातील सर्व सखल बहुजन समाज व गोपीचंद पडळकर प्रेमी यांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले.

आ. पडळकर हे ओबीसी मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी इंदापूर मधुन मेळाव्याच्या दिशेने निघाले असताना काही तरुणांनी चप्पल फेकून हल्ला केला. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर पडसात उमटत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन हा झालेला हल्ला निषेधार्थ आहे. म्हणुन सखल बहुजन समाजाच्या व गोपीचंद पडळकर प्रेमी यांच्यावतीने शनिवार दि. १६ रोजी सांगोला बंद ठेवून या झालेल्या हल्ल्याचा निषेध करणार असल्याचं निवेदन प्रशासनास देण्यात आले.
सकाळी ९.०० वाजता महात्मा फुले चौक ते राजमाता अहिल्यादेवी चौक या मार्गावरती चालत निघून निषेध नोंदवणार असल्याचे निवेदन व्यापारी संघटना व सांगोला पोलीस ठाण्याचे पो. नि. अनंत कुलकर्णी यांना देण्यात आले.

