मिरज पोलिसांना माहिती न देताच कारभार.?
मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | मिरज येथील किल्ला भागात एका सराईत गुन्हेगारास पकडण्यासाठी आलेल्या अकोला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाच्या हातावर तुरी देत लोकेश सुतार (वय ४०) रा. लिंगनूर ता. मिरज याने पलायन केले. पलायन करीत असताना लोकेश याच्या कारचा भीषण अपघात झाला. लोकेश हा सराईत गुन्हेगार आहे. अकोला पोलिसांना तो काही गुन्ह्यांमध्ये पाहिजे. लोकेश हा मिरजेतील न्यायालयाजवळ येणार असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली. त्याला पकडण्यासाठी आलेल्या अकोला पोलिसांनी मिरज किल्ला भागात न्यायालयात बाहेरच सापळा लावला. न्यायालया बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या कार जवळ तो आल्यानंतर अकोला पोलिसांची नजर त्याच्यावरती पडली. पोलीस दिसतात त्याने कार मध्ये बसून कारभार वेगाने पळवली. तो मिळेल त्या मार्गाने कार पळवू लागला. एका अरुंद असणाऱ्या गल्लीमध्ये त्याची कार अडकली. त्यामुळे तो कार घटनास्थळी सोडून अकोला पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. अकोला पोलिसांचे पथक आता मिरजेत तळ ठोकून बसले असल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाचे म्हणजे मिरज पोलिसांना कोणतीही कल्पना न देता अकोला पोलिसांनी लोकेश याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न फसला. कारण अकोला पोलिसांना मिरजेतील स्थानिकचे रस्तेच माहीत नसल्यामुळे लोकेशला पसार होण्यास यश आले.

