• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | सुगंधी तंबाखूचा साठा करणाऱ्या दुकानदारावर छापा; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Admin by Admin
December 14, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला आदी साहित्याची साठवणूक, विक्री करणाऱ्या आटपाडी शहरातील कलढोणे ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने तब्बल ३ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत ३७८ किलो तंबाखू व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. याबाबात अजय अंकुश कलढोणे (रा. आटपाडी), दिलीप म्हस्के (रा. सांगोला, जि. सोलापूर) यांच्यावर अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासनाने आटपाडीत छापा टाकला. कलढोणे ट्रेडर्स मधून अन्न औषध प्रशासन विभागाने पानमसाला (४८.७५ किलो), सुगंधित तंबाखू (३.६ किलो ग्रॅम), विमल पान मसाला (किंग प्याक) (१७.४ किलो) व्ही १ सुगंधित तंबाखू (किंग प्याक) (२.६ किलो), आरएमडी पानमसाला ( ४.४ किलो ग्रॅम), एम सुगंधित तंबाखू (३१५ ग्रॅम), राजू इलयची सुपारी ( ३३ किलो), रत्ना ३००० सुगंधित तंबाखू (३२ किलो), दिनाजी सुगंधित तंबाखू (८८किलो), प्रभात ३१० सुगंधित तंबाखू (७ किलो), राज कोल्हापुरी गुटखा (४.५ किलो), सुपर पान मसाला (२९.८ किलो), एसपी ९९९ सुगंधित तंबाखू ( ६.२ किलो), ३१० सुगंधित तंबाखू (३२.५ किलो), विनालेबल सुगंधित तंबाखू (१३ किलो), विनालेबलसुगंधित तंबाखू (२३.८ किलो), अंश ३००० सुगंधित तंबाखू (११.२ किलो).. अंश ३१० सुगंधित तंबाखू – (२१.२५० किलो) असे एकूण ३७८ किलो ३१५ ग्रॅम साहित्य साठा मिळून आला. मिळालेला साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत ३ लाख ६८ हजार ३०५ रूपये आहे. सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी हवालदार, स्वामी यांनी ही कारवाई केली.

Previous Post

ब्रेकिंग | महाराष्ट्र पोलिस संघास दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद

Next Post

मिरज | एलसीबीच्या पोलिसांना चकवा देत गुन्हेगाराचे पलायन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

मिरज | एलसीबीच्या पोलिसांना चकवा देत गुन्हेगाराचे पलायन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group