जयसिंगपूर प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | भाजप जयसिंगपूर मंडलाचे अध्यक्ष मिलींद भिडे यांनी नूतन कार्यकारिणी व विविध आघाडी अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या.
भाजपच्या परंपरेनुसार राष्ट्रीय अध्यक्ष ते मंडल अध्यक्ष नियुक्ती दर तीन वर्षांनी केली जाते. त्या अनुषंगाने जयसिंगपूर मंडलाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. जिल्हा उपाध्यक्षा वैशाली नायकवडी व विजया पाटील उपस्थित होत्या.
मंडलाची कार्यकारिणी अशी – सरचिटणीस- संतोष जाधव, माधुरी आलासकर व सुनिल ताडे, उपाध्यक्ष- वंसत पोवार, हरीष सुर्यवंशी, कुलदीप देशपांडे, राजेंद्र निर्मळ, समशुद्दीन सय्यद, राकेश पारीक, चिटणीस- योगेश अंधारे, शैलेश कुलकर्णी, भिमराव हडपद, सुधीर कुलकर्णी, धीरजलाल पटेल, अर्चना विभुते कोषाध्यक्ष- किरण कुलकर्णी.
मंडलाच्या विविध आघाडींचे अध्यक्ष जाहीर केले. महिला मोर्चा- महादेवी बिराजदार, युवा मोर्चा- पंकज गुरव, अनुसुचीत जाती व जमाती- रमेश कुकडे, इतर मागास आघाडी- महेश स्वामी, कायदा आघाडी- ॲड. सुहास कुलकर्णी, व्यापार आघाडी- योगेश बलदवा, दिव्यांग आघाडी- संजय चौगुले, अल्पसंख्यांक आघाडी- सुकुमार पाटील, सोशल मिडिया- सचिन ताडे, वैद्यकीय आघाडी- डॉ. निखील मगदूम, किसान आघाडी- सुरज रजपुत व भटके विमुक्त जाती व जमाती आघाडी- कुमार हतळगे.
जिल्हा कार्यकरिणी सदस्यपदी निवड झालेल्या डी. एन. जोशी, शैलेंद्र गाडे, राजकुमार बलदवा, ॲड. प्रसाद काळे, सुनिल शर्मा, मनिषा यळगुडकर, स्नेहल कुलकर्णी, विनायक अणेगिरीकर यांचा सत्कार केला. पदाधिकाऱ्यांना नेमणूक पत्र दिले. जिल्हा चिटणीस राजेंद्र दाईंगडे, जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस रागिणी शर्मा, पदवीधर प्रकोष्ठ जिल्हा संयोजक- रमेश यळगुडकर व कार्यकर्ता प्रशिक्षण जिल्हा संयोजक- सुनिल शर्मा यांचा सत्कार केला.

