कुपवाड प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | उसाचा बगॅस प्रमाणापेक्षा जास्त ट्रकच्या हौदात भरून मानवी सुरक्षितता धोक्यात येईल, अशी नियमबाह्य वाहतूक केल्याने कुपवाड पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक विनायक जाधव (वय -४० वर्षे) रा.चमकेरी, ता.अथणी, जिल्हा बेळगाव असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित ट्रक चालकाचे नाव आहे.
मंगळवारी रात्री एक अवजड ट्रक (एम एच १०, ए ६५१३ ) चालक अधिक जाधव यांनी आरटीओ नियमांचे उल्लंघन करून उसाचा बगॅस प्रमाणापेक्षा जास्त भरून वाहतूक करीत असल्याचे दिसून येताच पोलिसांनी कारवाई केली.

