कुपवाड प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | शहरातील बामनोली कॉर्नर चौकातील फुटपाथ वरील अतिक्रमणे आणि बेशिस्त वाहन पार्किंगवर बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली. या चौकात बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणे झाल्यास संबंधित वाहने आणि अतिक्रमणे जप्त करण्यात येतील. असा इशाराच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला.
रोजची वाहतुकीची कोंडी आणि अपघातामुळे हा चौक वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आणि पोलिसांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी संयुक्त कारवाई करून फुटपाथवरील पाच अतिक्रमणे आणि रिक्षा स्थानकाचे अतिक्रमण काढून टाकले.
ही कारवाई महापालिका आयुक्त, उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील, स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे, सिद्धांत ठोकळे, गणेश धोतरे आदींच्या उपस्थितीत केली.

