खबऱ्या ऑनलाईन प्रतिनिधी |पाचगणी जवळच असणाऱ्या कासवंड गावातील ‘स्प्रिंग रिसॉर्ट ‘ मध्ये डॉक्टरांसमोर युवतींचे तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत, नृत्यासह पार्टी चालू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आचल दलाल यांना मिळाली.त्यावरून साताऱ्यावरून विशेष पथक पाचगणी कासवंड येथे रवाना करण्यात आले.
पाचगणी : भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड येथील एका निसर्गरम्य ठिकाणावरील ‘स्प्रिंग रिसोर्ट’वर काल रात्री पोलिसांनी छापा टाकून चार नर्तिकांसह नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष बाररूममधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंधक घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016 चे कलम 3,8 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाचगणी जवळच असणाऱ्या कासवंड गावातील ‘स्प्रिंग रिसॉर्ट ‘ मध्ये डॉक्टरांसमोर युवतींचे तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत, नृत्यासह पार्टी चालू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आचल दलाल यांना मिळाली. त्यावरून साताऱ्यावरून विशेष पथक पाचगणी कासवंड येथे रवाना करण्यात आले.
पोलिस पथक घटनास्थळावर पोहोचताच रात्री दहा वाजनेचे सुमारास पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्टच्या तळमजल्यात सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज येथील एक असे सहा ते सात जण दारूच्या नशेत नर्तिकांच्या समोर झिंगत असतानाच रंगेहाथ पोलिसांना सापडले. छापा टाकला त्यावेळी नर्तिका नाचत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारवाई करत चार महिला त्यांच्यासमवेत नाचणाऱ्या सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट रिसॉर्ट चालक, असे एकूण आठ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
पाचगणी पोलीस पोलिस ठाण्यात यातील सहभागी विशाल सुरेश शिर्के (वय 36 वर्ष ) व्यवसाय हॉटेल राहणार पसरणी तालुका वाई जिल्हा सातारा, उपेंद्र उर्फ कृष्णा दयावंत प्रशादकोल (वय 31 वर्ष) व्यवसाय वेटर राहणार स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट कासवंड तालुका महाबळेश्वर मूळ राहणार पाती तालुका गुड जिल्हा रिवा मध्य प्रदेश , रणजीत तात्यासाहेब काळे (वय 43 वर्षे) व्यवसाय डॉक्टर राहणार बाजार पटांगण दहिवडी तालुका माण जिल्हा सातारा, निलेश नारायण सन्मुख (वय 39 वर्षे ) व्यवसाय डॉक्टर राहणार लक्ष्मी मार्केट ,मिरज, जिल्हा सांगली, प्रवीण शांताराम सैद (वय 40 वर्ष) व्यवसाय फार्मासिस्ट राहणारा आलडीया, माळुंगे पाडळे, पुणे ,तालुका मुळशी जिल्हा पुणे, मनोज विलास सावंत (वय 40 वर्षे )व्यवसाय डॉक्टर राहणार जयवंत नगर ,दहिवडी ,तालुका माण,जिल्हा सातारा, महेश बाजीराव साळुंखे (वय 40 वर्षे) व्यवसाय डॉक्टर राहणार मलकापूर कराड तालुका कराड जिल्हा सातारा, राहुल बबन वाघमोडे (वय 31 वर्षे )व्यवसाय डॉक्टर राहणार गोंदवले तालुका माण जिल्हा सातारा, हनुमंत मधुकर खाडे (वय65 वर्षे) राहणार दहिवडी तालुका माण जिल्हा सातारा अशा नऊ जणांवर पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वरील सर्वांनी आपसात संगनमत करून चार बारबालांना बिभत्स कृत्य करण्यास प्रोत्साहन दिले तसेच प्रिमायसेस परवान्याचे नूतनीकरण न करता रिसॉर्ट मध्ये विना नोकरनामा चार महिलांना कामावर ठेवले असून सदर बारबाला करत असलेले कृत्य हे किळसवाणे व लज्जास्पद असल्याने सदर घटनेबाबत सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची फिर्याद उमेश रामचंद्र लोखंडे (वय 32 वर्ष) पोलीस कॉन्स्टेबल यांनी पांचगणी पोलिसात दिलीं आहे. अधिक तपास पांचगणी पोलीस ठण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश माने करीत आहेत.
या कारवाईत सातारा जिल्ह्यातील डॉक्टरांचा समावेश असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दहिवडी, कराड, मिरज , सातारा व पुणे येथील हे डॉक्टर आहेत. यामुळे या हाय प्रोफाइल पार्टीची चर्चा दिवसभर सुरू आहे.
पाचगणी कासवंड मधील एका रिसॉर्ट वर गैरकृत्य सुरू होते. यावरून चालक मालक तसेच पर्यटकांवर गुन्हे दाखल केले आहेत.पाचगणी पोलीस पूढील तपास करीत आहेत.याबरोबरच येणाऱ्या काळात आपण नाताळ आणि नववर्ष साजरे करणार आहोत. सर्व हॉटेल,रिसॉर्ट चालक,मालक आणि पर्यटक यांनी याही काळात कायद्याचे पालन करून,कायद्याच्या चौकटीत राहून सर्व सण उत्सव साजरे करावेत.जर अस झालं नाही,तर संबंधित लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल.
–समीर शेख,जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा

