• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगांव मधील प्लॉट नावावर करून देतो म्हणून पावणेतीन लाख उकळले

प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्याचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर

Admin by Admin
December 13, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • प्रांत कार्यालयाला भ्रष्टाचाराची कीड
  • प्लॉट नावावर नाहीच पण पैसे परत देण्यासही दोन वर्षापासून टाळाटाळ

कडेगांव:- तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून त्यांचा कडेगांव मधील खरेदी घेतलेला प्लॉट नावावर करून देतो म्हणून प्रांत कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने जानेवारी २०२१ मध्ये ६० हजार आणि मार्च २०२१मध्ये दोन लाख असे जवळपास पावणे तीन लाख उकळले मात्र आज अखेर त्या कर्मचाऱ्याकडून संबंधित शेतकऱ्याचा प्लॉट नावावर करून देण्यात आला नाही. याच दरम्यान संबंधित शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर वारसांनी याबाबत पाठपुरावा केला असता संबंधित कर्मचाऱ्याने त्यांना आज अखेर झुलवत ठेवले आहे.

कडेगांव तालुक्यातील विहापुर येथील शेतकरी नोकरी निमित्त मुंबई येथे राहत होते.कामावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी कडेगांव शहरात प्लॉट घेतला तो नावावर करून घेण्यासाठी प्रयत्न चालू असताना त्यांची भेट प्रांत कार्यालयातील या कर्मचाऱ्याशी झाली यावेळी तुमचा प्लॉट नावावर करून देतो म्हणून त्याने संबंधित शेतकऱ्याकडून पैशाची मागणी केली. शेतकरी हुशार असल्याने त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला रोख पैसे न देता बँक ऑफ इंडिया कडेगांव शाखेतील त्याच्या खात्यावर पहिले ६० हजार रुपये ३० जानेवारी २०२१ ला भरले. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याकडून आणखी पैशाची मागणी करण्यात आल्यानंतर त्याच खात्यावर २५ मार्च रोजी १ लाख रुपये व २६ मार्च २०२१ रोजी १ लाख असे दोन लाख साठ हजार रुपये खात्यावर भरल्यानंतर लवकरच तुमचे काम करून देतो म्हणून सांगितले. दोन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर पाठपुरावा केला असता टाळाटाळ व खेळवाा खेळवी सुरू झाली. यातच ऑक्टोंबर २०२१ मध्ये संबंधित शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

त्यांच्या पत्नीने याबाबत पाठपुरावा केला असता त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे येऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. वारसांनी आमचे काम राहू द्या पैसे परत द्या म्हणून तगाजा लावल्यानंतर आज अखेर त्यांना खेळवले जात आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्याचे वारसदार बँकेत पैसे भरल्याचा स्लिप घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत तर संबंधित कर्मचाऱ्यास कामावरून बडतर्फ करावे अशी मागणी होत आहे. मुळात हा कर्मचारी प्रांत कार्यालयातील कर्मचारी नसून हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. कार्यालयात शिपाई नसल्याने याची नेमणूक प्रांत कार्यालयात केली आहे. याने आजपर्यंत अनेकांना अशा प्रकारे गंडा घातला आहे. कार्यालयातील दप्तराची माहिती असल्याने तक्रारी येऊनही त्याच्याकडे कानाडोळा केला जात होता मात्र आता या कर्मचाऱ्याने लोकांना लाखोंचा गंडा घालण्यास सुरुवात केल्याने ही किड प्रांत कार्यालयाला पोखरणार आहे त्यामुळे वेळीच कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Previous Post

सर्वात मोठी बातमी : महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला अटक

Next Post

ब्रेकिंग | मिरजेतील डॉक्टर हायप्रोफाईल पार्टीत सापडले : पोलिसांचा छापा ; चार बारबालांसह नऊ डॉक्टरांवर कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मिरजेतील डॉक्टर हायप्रोफाईल पार्टीत सापडले : पोलिसांचा छापा ; चार बारबालांसह नऊ डॉक्टरांवर कारवाई

ब्रेकिंग | मिरजेतील डॉक्टर हायप्रोफाईल पार्टीत सापडले : पोलिसांचा छापा ; चार बारबालांसह नऊ डॉक्टरांवर कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group