• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत लाच घेतल्याप्रकरणी सरकारी वकिलास अटक

Admin by Admin
December 12, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगलीत लाच घेतल्याप्रकरणी सरकारी वकिलास अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खटल्यात तडजोड घडवून लवकर निकाल मिळवून देण्यासाठी 20 हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी सरकारी वकील सोमनाथ काकासोा माळी (वय 36, रा. सुभाषनगर, ता. मिरज) यांना ‘लाचलुचपत’ विभागाने रकमेसह सोमवारी रंगेहात पकडले.

याबाबत तक्रारदारांनी येथील ‘लाचलुचपत’ विभागाकडे आठ डिसेंबर रोजी तक्रार केली होती. ‘लाचलुचपत’ विभागाने विजयनगर येथील न्यायालय परिसरामध्ये सापळा रचला होता. दुपारी चारच्या दरम्यान लाचेच्या रकमेपैकी 20 हजार रुपये तक्रारदार यांनी माळी यांना दिले. ही रक्कम माळी यांनी न्यायालयाबाहेर असलेल्या रस्त्यावर पंचासमक्ष स्वीकारली. त्यानंतर मोटरसायकलवरून निघून जाताना त्यांना नेमीनाथनगर येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरा सुरू होती. पोलिस उपायुक्त अमोल तांबे, अप्पर पोलीस उपायुक्त पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संदीप पाटील, उपअधीक्षक विनायक भिलारे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी आदींनी कारवाईमध्ये भाग घेतला.

Previous Post

सांगली सिव्हीलचे अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांचे निलंबन करण्याची काँग्रेसची मागणी

Next Post

राजेश क्षीरसागर यांच्या दहशतीचा नवा कारनामा; क्षीरसागर पिता-पुत्राकडून शेजाऱ्यांना जबर मारहाण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राजेश क्षीरसागर यांच्या दहशतीचा नवा कारनामा; क्षीरसागर पिता-पुत्राकडून शेजाऱ्यांना जबर मारहाण

राजेश क्षीरसागर यांच्या दहशतीचा नवा कारनामा; क्षीरसागर पिता-पुत्राकडून शेजाऱ्यांना जबर मारहाण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group