• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली सिव्हीलचे अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांचे निलंबन करण्याची काँग्रेसची मागणी

Admin by Admin
December 12, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
सांगली सिव्हीलचे अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांचे निलंबन करण्याची काँग्रेसची मागणी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : गोरगरीब रुग्णांचा आधार असणाऱया सांगलीच्या सिव्हील हॅस्पिटलला सिटी स्कॅन मशीन खरेदीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी वेळेत मशीनची खरेदी न केल्याने हा निधी शासनाकडे परत गेला आहे.

त्यामुळे अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्यावर निलंबनाची किंवा त्यांच्या बदलीची कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस अशोक मासाळे यांनी केली आहे.

याबाबत सिव्हील प्रशासनाला त्यांनी निवेदन दिले असून, संबंधित खात्याचे मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱयांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे मासाळे यांनी सांगितले. सांगलीच्या सिव्हील हॅस्पिटलसाठी 27 मार्च 2022 रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने सिटी स्कॅन मशीन देण्यासाठी हाफकीन या कंपनीला निधी वर्ग केला होता. हा निधी वर्ग झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्यासह सिव्हील प्रशासनाने हे मशीन खरेदीसाठी तसेच ते बसवण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे 30 मे 2023 रोजी सिटी स्कॅन मशीनसाठी आलेला निधी शासनाकडे परत गेला आहे. याला अधिष्ठाता डॉ. नणंदकर जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करावे किंवा त्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणीही मासाळे यांनी केली.

अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्या भोंगळ कारभाराबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात येणार असल्याचे मासाळे यांनी सांगितले. यावेळी मासाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सिव्हील परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी सांगली सिव्हीलचे सहायक अधिष्ठाता डॉ. देवकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राज्य प्रवक्ते संतोष पाटील, सर्जेराव पाटील, अनमोल पाटील, सुशांत कदम, बाजीराव गस्ते, सचिन आरवाळे, सचिन काटकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

चंदनाचे झाड चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

सांगलीत लाच घेतल्याप्रकरणी सरकारी वकिलास अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत लाच घेतल्याप्रकरणी सरकारी वकिलास अटक

सांगलीत लाच घेतल्याप्रकरणी सरकारी वकिलास अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group