• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेकडे ८३ लाखांची अपसंपदा, गुन्हा दाखल

Admin by Admin
December 7, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
सांगली : तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेकडे ८३ लाखांची अपसंपदा, गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : सांगलीतील निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णु कांबळे यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळविलेली ८३ लाखांची मालमत्ता चौकशीमध्ये आढळून आल्याने त्यांच्यासह पत्नी विरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधिक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी दिली.

निवृत्तीच्यावेळी माध्यमिक विभागाचे तत्कालिन शिक्षणाधिकारी कांबळे हे लाच घेत असताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले होते. या प्रकरणी त्यांच्याविरूध्द ७ मे २०२२ रोजी गुन्हाही दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांच्या घराची झडती घेण्यात आली असता १० लाख रूपये रोख आढळून आले होते. या रकमेबाबत त्यांना समाधानकारक खुलासा करता आलेला नव्हता.

लाच घेत असताना सापडल्यामुळे कांबळे व त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे यांच्या मालमत्तेची खुली चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली. १६ जून १९८६ ते ६ मे २०२२ या कालावधीत त्यांच्याकडे कायदेशीर मार्गाने असलेले उत्पन्न आणि प्रत्यक्षात त्यांच्याकडे असलेली मालमत्ता यामध्ये तफावत आढळून आली. ज्ञात स्त्रोतापेक्षा ३६ टक्के अधिक उत्पन्न दिसून आले. यामुळे भ्रष्टाचाराच्या मार्गाने त्यांनी ८२ लाख ९९ हजार १५२ रूपयांची मालमत्ता संपादन केल्याचे आढळून आले. या कृतीस पत्नीनेही अपप्रेरणा दिली असल्याने पती- पत्नी विरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | “बोली लावून अधिकाऱ्यांची बदली सुरूये, शिंदे गटाच्या ‘या’ दोन मंत्र्याचा यात हात”; संजय राऊत यांचे गंभीर आरोप

Next Post

सांगली | तहसील कार्यालयातील ‘झिराे’ कर्मचाऱ्यांना दणका! कामावरून हाकलले ; तहसीलदार सागर ढवळे यांचा धाडसी निर्णय

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | तहसील कार्यालयातील ‘झिराे’ कर्मचाऱ्यांना दणका! कामावरून हाकलले ; तहसीलदार सागर ढवळे यांचा धाडसी निर्णय

सांगली | तहसील कार्यालयातील 'झिराे' कर्मचाऱ्यांना दणका! कामावरून हाकलले ; तहसीलदार सागर ढवळे यांचा धाडसी निर्णय

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group