• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | “बोली लावून अधिकाऱ्यांची बदली सुरूये, शिंदे गटाच्या ‘या’ दोन मंत्र्याचा यात हात”; संजय राऊत यांचे गंभीर आरोप

Admin by Admin
December 6, 2023
in मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | “बोली लावून अधिकाऱ्यांची बदली सुरूये, शिंदे गटाच्या ‘या’ दोन मंत्र्याचा यात हात”; संजय राऊत यांचे गंभीर आरोप
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

06 डिसेंबर 2023 : नवी दिल्ली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या आरोग्य खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला आहे. आरोग्य विभागातील भ्रष्टाचार हा गंभीर विषय आहे. कारण गोरगरीब जनतेच्या जगण्याचा हा विषय आहे. यांनी पक्ष सोडला तो लुटमार करण्यासाठी अस वाटतं. कारण ठाकरे सरकारमध्ये अशी संधी नव्हती. ते बेकायदेशीर असले तरी मुख्यमंत्री आहे म्हणून मी पत्र लिहिलं आहे, असं संजय राऊत म्हणालेत. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आरोप केलेत.

  • राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र..

पुण्यातील ससूनमध्ये कारवाई केली तो लहान मोहोरा आहे. राज्यातील आरोग्य विषयाचा मुद्दा मी साडेतीन हजार पानाच्या पुराव्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे. बदली आणि बढतीचे व्यवहार कसे होतात? ते सगळे पुरावे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत. बदल्यांचे पैसे गोळा करण्यासाठी OSD लेव्हल चे अधिकारी नेमले आहेत. ते पैसे कात्रजच्या कार्यालयात पोहचवले जातात… तिथं कोणाचं ऑफिस आहे हे आपल्याला माहीत आहे. मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

  • “… तर यापेक्षा मोठा स्फोट करेल”

आरोग्य खात्यातील भ्रष्टाचारासंदर्भात कोणाला अधिक पुरावे हवे असतील तर तुमचा अधिकारी पाठवा. मी आणखी पुरावे देतो. बदल्यांची औक्षण पद्धत काही दिवस आधी वनखात्यात होती. मी राज्यसभा सदस्य म्हणून पत्र लिहिलं आहे. जर मला याच उत्तर आलं नाही तर मी यापेक्षा मोठा स्फोट करेल, असा गर्भित इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

  • या दोन मंत्र्यांचा हात”..

आरोग्य खात्याच्या संचालक पदासाठी पैशांची मागणी केली जात आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आरोग्य खात्यात 50 कोटी रुपये जमा केले गेलेत. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांवर सध्या दबाव आहे. ललित पाटील प्रकरणात आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि दादा भुसे यांचा यात सहभाग आहे का?, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. या दोघांच्या सहभागाशिवाय या गोष्टी घडणार नाहीत, असं राऊत म्हणाले.

  • आरोग्य खात्यात पदांचा लिलाव सुरू”

रेट काय आहेत ते मी पत्रात लिहिले आहेत. जनावरांचा बाजार भरल्यासारखं या पदांचा लिलाव सुरू आहे. देशाच्या आरोग्य मंत्री यांनाही या पत्राच्या प्रती पाठवल्या आहेत. बघूया कोणाचा दिवा आता या प्रकरणी पेटत आहे. ललित पाटील प्रकरणाची सविस्तर माहिती आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे आहे. ते यावर सविस्तर भांडत आहेत. या प्रकरणाचीही कसून चौकशी व्हावी, असं राऊत यांनी म्हटलंय

Previous Post

Maratha Reservation । मराठा समाजासाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस, मराठा आरक्षण वैध की अवैध? आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी; संपूर्ण महाराष्ट्राचे लागले लक्ष

Next Post

सांगली : तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेकडे ८३ लाखांची अपसंपदा, गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेकडे ८३ लाखांची अपसंपदा, गुन्हा दाखल

सांगली : तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेकडे ८३ लाखांची अपसंपदा, गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group