मिरजेत एकाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांनी महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे डेंग्यू वाढत असल्याचे म्हटले. तसेच रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्णांचा बळी जात असल्याचा आरोप नागरिकांनी गोपनीय खबऱ्याशी बाेलताना केला.
मिरजेत हबीब शेख यांचा डेंग्यूने दुर्दैवी मृत्यू झाला. गेले पंधरा दिवस त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. हबीब शेख भाजपच्या सांगली जिल्हा वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष म्हणून सक्रिय होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या मिरज शहरात डेंग्यू साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. सुमारे 20 रुग्ण डेंग्यूचे आढळले आहेत. त्यामध्ये 8 वर्षाच्या बालकाचा ही समावेश आहे. हे रुग्ण सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत.
महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे हबीब शेख यांचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी साम टीव्हीशी बाेलताना केलाे. मिरज शासकीय रुग्णालयात अस्वच्छता असल्याने त्या ठिकाणी स्वच्छ्ता मोहीम राबवणे आवश्यक असल्याचे म्हटले.
या ठिकाणी उपाचारासाठी दाखल असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य सुरक्षित राहील याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेच वेळेत कचरा उचलला जात नसल्याने स्वछतेचा शहरात बोजवारा उडाला असल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
साथीच्या आजारावर उपाययोजना करण्यासाठी डास प्रतिबंधक औषधे फवारणी करण्याची मागणी अजगर शरीकमसलत यांनी केली.

