• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | अन् अखेर “तो” निलंबित.! वाचा सविस्तर

Admin by Admin
December 1, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / चार महिन्यांची हजेरी लावून मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात १२ हजारांच्या लाचेची मागणी करत त्यातील आठ हजार रुपये स्विकारताना महापालिकेच्या प्रभारी मुकादम किशोर जगन्नाथ जबडे (वय ४८, रा.मदिना मशिदीजवळ सुभाषनगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी जबडे याला महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी गुरुवारी निलंबित केले.

तक्रारदार हा मानधनावर महापालिकेकडे सेवेत आहे तर संशयित किशोर जबडे हा आरोग्य विभागात प्रभाग २० साठी प्रभारी मुकादम म्हणून कार्यरत आहे. तक्रारदाराची चार महिन्यांची हजेरी लावून मानधन काढून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येक महिन्याचे तीन हजार असे १२ हजारांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. तडजोडीअंती आठ हजारांची लाचेची मागणी केल्याचे ‘लाचलुचपत’च्या तपासात निष्पन्न झाले होते.

त्यानुसार मिरज शहर पोलिस ठाण्याच्या बाजूस असलेल्या एका चहा टपरीजवळ सापळा लावला असता, तक्रारदाराकडून आठ हजारांची लाच स्विकारताना जबडे याला रंगेहाथ पकडले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जबडे याला निलंबित करण्यात आले. महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी ही कारवाई केली.

Previous Post

मिरज | भाजप वाहतूक सेनेच्या उपाध्यक्षांचा डेंग्यूने घेतला बळी, नागरिकांचा महापालिकेवर राेष

Next Post

तासगाव | कदमचा खून “त्या” तिघांनीच केल्याचा संशय..? नेमकं काय घडलं..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Crime: किरकोळ वादातून तरुणाची हत्या; रहिवाशांनी केली पोलिसांवर दगडफेक!

तासगाव | कदमचा खून "त्या" तिघांनीच केल्याचा संशय..? नेमकं काय घडलं..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group