• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत शोष खड्ड्यात बुडून बालिकेचा मृत्यू, महापालिकेविरोधात नातेवाईकांचा आक्रोश

Admin by Admin
November 25, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगलीत शोष खड्ड्यात बुडून बालिकेचा मृत्यू, महापालिकेविरोधात नातेवाईकांचा आक्रोश
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : शहरातील शामरावनगर येथील ज्ञानेश्वर कॉलनीत शोष खड्ड्यात बुडुन दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. तहुरा राजू मुलाणी असे तिचे नाव आहे. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

परिसरात सुरू असणाऱ्या गटारीच्या कामातील दिरंगाईमुळेच हा बळी गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी महापालिकेच्या कारभाराविरोधात आक्रोश केला. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजू मुलाणी हे कुटूंबियांसह शामरावनगरमधील ज्ञानेश्वर कॉलनीत राहण्यास आहेत. राजू मुलाणी यांना तहुरा ही एकुलती एक मुलगी होती. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास तहुरा घराबाहेर एकटीच खेळत होती. कुटूंबिय कामात व्यस्त असल्याने त्यांचेही तिच्याकडे लक्ष नव्हते. महापालिकेकडून सध्या शामरावनगर परिसरात गटारीचे काम सुरू केले आहे. ज्ञानेश्वर कॉलनीतही काम करणाऱ्या कंत्राटदाराने शोष खड्डा बांधला असलातरी तो उघडाच होता. तसेच गटारीची खोली मोठी असल्याने अगोदरच या भागातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

तहुरा खेळत खेळतच या गटरीमध्ये पडली. गटारीची खोली आणि त्यातील पाण्यामुळे ती खाली गेली. नातेवाईकांनी ती कोठे दिसत नसल्याने शोध सुरू केला. याचवेळी त्यांच्या नातेवाईकांना तिचा ड्रेस गटारीत तरंगताना आढळला. यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यातील पाण्यात शोध घेतला असता, तहुरा मृतावस्थेत आढळून आली.

महापालिका प्रशासनाने रेंगाळत काम ठेवल्यानेच ही वेळ आल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवला. महापालिकेकडून दिरंगाई झाल्यामुळेच एकुलत्या एक मुलीचा मृत्यू झाल्याने मुलाणी कुटूंबियांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.

Previous Post

Sangli Breaking : कोयनेच्या पाण्यावरुन राजकारण तापले! खासदार संजय काका पाटील राजीनामा देणार? शंभूराज देसाईंना इशारा..!

Next Post

जत तालुक्यात दोन्ही भावांनी करामत केली : उमदी पोलिसांच्या कारवाईने तालुक्यात खळबळ..! वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जत तालुक्यात दोन्ही भावांनी करामत केली : उमदी पोलिसांच्या कारवाईने तालुक्यात खळबळ..! वाचा सविस्तर

जत तालुक्यात दोन्ही भावांनी करामत केली : उमदी पोलिसांच्या कारवाईने तालुक्यात खळबळ..! वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group