• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sangli Breaking : कोयनेच्या पाण्यावरुन राजकारण तापले! खासदार संजय काका पाटील राजीनामा देणार? शंभूराज देसाईंना इशारा..!

Admin by Admin
November 25, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
Sangli Breaking : कोयनेच्या पाण्यावरुन राजकारण तापले! खासदार संजय काका पाटील राजीनामा देणार? शंभूराज देसाईंना इशारा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Sangli Political News :गली आणि सातारा जिल्ह्यात कोयना-कृष्णा पाणी प्रश्नावरुन वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. कोयनेतून सांगलीला पाणी सोडण्यावरून महायुती मध्येही संघर्ष पेटला असून भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून थेट राजीनामा देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर भाजपा खासदार संजयकाका पाटलांवकडून सडकून टीका करत राजीनामा देण्याची आक्रमक भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले संजय काका पाटील?

“पाणी अडवून आमच्या आत्म सन्मानाला ठेच लावण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. असे म्हणत कोयना धरणाचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही, मंत्री देसाई यांची लुडबुड खपवून घेणार नाही..” असे खासदार संजय काका पाटील यांनी दिला आहे. तसेच “पाणी अडवण्याची भूमिका घेणार असाल तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.

फडणवीस- अमित शहांकडे करणार तक्रार…

यावेळी पुढे बोलताना “सांगली जिल्ह्यातील जनतेला भीक मागितल्यासारखी परिस्थिती आणणे ठीक नाही. यावरुन राजकारण केले जात आहे. याबाबत संबंधितांची तक्रार आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंदीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार आहोत,” असे संजय काका पाटील म्हणाले.

शंभूराज देसाईंनी मधे पडू नये…

“वीज विकत घेता येईल पाणी नाही. आमच्या पक्षासोबत सत्तेत असलेले लोक राजकारण करत असतील तर ते आम्ही सहन करणार नाही. राजकीय हस्तक्षेप करून जिल्ह्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवली जात असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. कोयना धरण कुणाच्या मालकीचा आहे का? सांगली जिल्ह्याच्या हक्काच्या पाणी प्रश्नाच्या विषयात बाबतीत शंभूराजे देसाईंनी पडू नये” असेही संजय काका पाटील यावेळी म्हणाले.

Previous Post

सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

Next Post

सांगलीत शोष खड्ड्यात बुडून बालिकेचा मृत्यू, महापालिकेविरोधात नातेवाईकांचा आक्रोश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत शोष खड्ड्यात बुडून बालिकेचा मृत्यू, महापालिकेविरोधात नातेवाईकांचा आक्रोश

सांगलीत शोष खड्ड्यात बुडून बालिकेचा मृत्यू, महापालिकेविरोधात नातेवाईकांचा आक्रोश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group