• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जत तालुक्यात दोन्ही भावांनी करामत केली : उमदी पोलिसांच्या कारवाईने तालुक्यात खळबळ..! वाचा सविस्तर

Admin by Admin
November 26, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जत तालुक्यात दोन्ही भावांनी करामत केली : उमदी पोलिसांच्या कारवाईने तालुक्यात खळबळ..! वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत : उमदी पोलिसांच्या कारवाईने जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. नेहमीच सतर्क आणि सावध पवित्रा घेऊन अवैध धंदे चालक व गुन्हेगार यांच्या मुसक्या आवळण्यासाठी उमदी पोलीस चोवीस तास अलर्ट असतात.

गिरगाव (ता. जत) येथील ऊस शेतीत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गांजा शेतीवर छापा टाकून १३ लाख ६८ हजार ६५० रुपयांचा १३६ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी उमदी पोलिसांनी सिकंदर बगसू कोतवाल (वय ५०) व उस्मान बगसू कोतवाल (वय ५०) (दोघेही रा.कोतवाल वस्ती गिरगाव ता.जत) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजीत गोदे यांनी याबाबत उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सिकंदर कोतवाल याला अटक केली असून उस्मान कोतवाल हा फरार आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास केली. याबाबत अधिक माहिती अशी की, गिरगाव येथील कोतवाल वस्ती या ठिकाणी ऊस शेतीत गांजा लागवड केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांना मिळाली होती. पोलिसांनी कोतवाल वस्ती या ठिकाणी छापा टाकला असता ऊस शेतात एका बांधावर गांजा लागवड केल्याचे दिसून आले. शेजारी कांद्याच्या शेतात एक व्यक्ती उभा होता. हे शेत कोणाचे आहे असे पोलिसांनी विचारणा केली असता माझेच आहे सांगितले. सिकंदर कोतवाल नाव असल्याचे सांगितले. बाजूच्या शेतात ही गांजा असल्याचे दिसून आले. सदरची शेती ही उस्मान कोतवाल याची असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही शेतातील ओला गांजा उपटून काढण्यात आला. पोलिसांनी सुमारे १३ लाख ६८ हजार ६५० रूपयांचा १३६ किलो गांजा जप्त केला.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, नामदेव काळेल, पोलीस उपनिरीक्षक शरिष शिंदे, आप्पासाहेब हाके, प्रशांत कोळी, इंद्रजीत गोदे, सोपान भडे यांनी सहभाग घेतला. या कारवाईनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे म्हणाले पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैद्य व्यवसायावर कडक कारवाई सुरू आहे. असे व्यवसाय असणाऱ्यांची नावे गोपींनीय पद्धतीने माहिती द्यावीत, असेही आवाहन केले.

Previous Post

सांगलीत शोष खड्ड्यात बुडून बालिकेचा मृत्यू, महापालिकेविरोधात नातेवाईकांचा आक्रोश

Next Post

मोठी ब्रेकिंग | “एक महिन्याच्या आत फरार आरोपीस अटक करतोय, आम्हास वेळ द्या” म्हणणाऱ्या पोलिसांना ७ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

मोठी ब्रेकिंग | "एक महिन्याच्या आत फरार आरोपीस अटक करतोय, आम्हास वेळ द्या" म्हणणाऱ्या पोलिसांना ७ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group