• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

Admin by Admin
November 25, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आष्टा : फारणेवाडी (ता. वाळवा) येथील शेतकरी संतोष तानाजी पाटील (वय २८) व त्यांच्या वडिलांना ढवळी (ता. वाळवा) येथील खासगी सावकार सचिन विठ्ठल पाटील याने मारहाण, शिवीगाळ करीत घर पेटवून देण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली.

दहा लाखांसाठी बारा लाख चाळीस हजाराची वसुली करूनही सचिन पाटील त्रास देत असल्याने संतोष पाटील यांनी आष्टा पोलिसात तक्रार दिली आहे.

याबाबत आष्टा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फारणेवाडी येथील शेतकरी संतोष पाटील यांनी ढवळी येथील खासगी सावकार सचिन पाटील याच्याकडून ३ फेब्रुवारी २०२० ते २५ एप्रिल २०२० पर्यंत ८ लाख रुपये महिना १० टक्के व्याजाने घेतले. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी व्याजासह १२ लाख रुपये सचिन पाटील यास परत केले. त्यानंतर पुन्हा संतोष पाटील याने १० डिसेंबर २०२० रोजी १० टक्के व्याजाने १० लाख रुपये सचिन पाटील याच्याकडून घेतले.

व्याज म्हणून १ लाख रुपये सचिन पाटील याने लगेच घेतले. उर्वरित ९ लाखापाेटी ८ जानेवारी २०२१ ते ६ एप्रिल २०२१ या दरम्यान वेळोवेळी संताेष यांनी व्याजासह १२ लाख ४० हजार रुपये परत केले. घेतलेल्या रकमेपेक्षा जादा पैसे परत करूनही आणखी रकमेची मागणी करत सचिन पाटील याने संतोष पाटील व त्याच्या वडिलांना मारहाण करीत, शिवीगाळ केली घर पेटवून देण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.

Previous Post

तडसर येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय गोदामाचे आज भुमिपुजन: तहसीलदार अजित शेलार

Next Post

Sangli Breaking : कोयनेच्या पाण्यावरुन राजकारण तापले! खासदार संजय काका पाटील राजीनामा देणार? शंभूराज देसाईंना इशारा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Sangli Breaking : कोयनेच्या पाण्यावरुन राजकारण तापले! खासदार संजय काका पाटील राजीनामा देणार? शंभूराज देसाईंना इशारा..!

Sangli Breaking : कोयनेच्या पाण्यावरुन राजकारण तापले! खासदार संजय काका पाटील राजीनामा देणार? शंभूराज देसाईंना इशारा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group