कडेगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा विभाग नोडेल एजन्सी , महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे सहकार्याने नाबार्ड व ग्रामीण पायाभूत विकास निधी योजने अंतर्गत तडसर ता.कडेगाव येथे अन्न व नागरी पुरवठा विभागासाठी २१६० मे. टन क्षमतेचे गोदामे व इतर अनुषंगीक बाबींचा भुमिपुजन समारंभ पालकमंत्री डॉ . सुरेश (भाऊ) खाडे यांच्या हस्ते रविवार (दि.२६) रोजी दुपारी ३ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती तहसीलदार अजित शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तहसीलदार शेलार म्हणाले भुमिपुजन कार्यक्रम पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन खा. संजय (काका) पाटील,आ.अरूण लाड,आ. डॉ. विश्वजीत कदम हे प्रमुख उपस्थित राहनार आहेत.तर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपक तावरे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, कडेगाव उपविभागीय अधिकारी अजय शिंदे विशेष उपस्थिती राहणार आहेत.

