• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अधिकारी अवैध दारूच्या अड्ड्यावर छापा मारायला गेले अन् मार खाऊन आले..!

Admin by Admin
November 25, 2023
in क्राईम
0
अधिकारी अवैध दारूच्या अड्ड्यावर छापा मारायला गेले अन् मार खाऊन आले..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अवैध दारूच्या अड्डय़ावर छापा मारण्यासाठी गेलेल्या दौंड व बारामतीच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना लाकडी काठी व दगडाने मारहाण केली.

तसेच शासकीय व खाजगी वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवार (दि. २३) रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास माळेगाव हद्दीत विक्रमनगर येथे आरोपी यांच्या राहते घरासमोर हा प्रकार घडला. तर मारहाणीत जखमी अधिकारी बारामतीत रुग्णालयात उपचार घेत आहेत.

रात्री अकरा वाजण्याच्या पुढे हे अधिकारी अवैध दारूच्या अड्डय़ावर छापा मारायला गेले होते. दरम्यान जमावाकडून अधिकाऱ्यांना काठी व दगडाने बेदम मारहाण झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन खळबळ उडाली आहे. तर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या धक्कादायक प्रकारामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

या मारहाणीत उत्पादन शुल्क विभागाचे शासकीय वाहनांवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले आहे. फिर्यादी विजय वसंतराव रोकडे (वय ५५), यांनी आरोपी किशोर जनार्धन धनगर, पिंटु गव्हाणे व अनोळखी ८ ते १० इसम सर्व रा. विक्रमनगर माळेगाव, ता. बारामती, जि.पुणे. यांच्या विरोधात सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनीयमानुसार माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत सरकारी वाहन (क्र. एमएच १२टीके ९६९२), व खाजगी वाहन (क्र. एमएच १४ केएफ८०८०) या वाहनांचे नुकसान झाले आहे.

तसेच मारहाणीत फिर्यादीसह गणेश बाबुराव नागरगोजे (वय ३३), राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक दौंड, सुभाष लक्ष्मण मांजरे (वय ५६), राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक दौंड, प्रविण रामचंद्र सुर्यवंशी (वय ४३) राज्य उत्पादन जवान दौंण्ड, अशोक काशीनाथ पाटील (वय ५०), राज्य उत्पादन शुल्क जवान दौंड, सागर रामचंद्र सोनवले (वय ४०), रा .मळद ता बारामती जि पुणे. हे जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यातील फिर्यादी हे त्यांच्या स्टाफ व पंचासह शासकीय काम करीत असताना यातील आरोपी यांनी बेकायदा जमाव जमवून हातातील काठीने व दगडाने मारहान करुन शिवीगाळी केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करुन शासकीय व खाजगी वाहनांना दगड मारुन काचा फोडण्यात आल्या आहेत. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे हे अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

ब्रेकिंग । ३१ डिसेंबरपर्यंत शिंदे सरकार पडणार, बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ

Next Post

तडसर येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय गोदामाचे आज भुमिपुजन: तहसीलदार अजित शेलार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तडसर येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय गोदामाचे आज भुमिपुजन: तहसीलदार अजित शेलार

तडसर येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय गोदामाचे आज भुमिपुजन: तहसीलदार अजित शेलार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group