• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

Admin by Admin
November 23, 2023
in क्राईम
0
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आयकर विभागाने तीन बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर आणि कार्यालयावर गुरुवारी छापे मारले. सकाळी सहा वाजता आयकर विभागाचे पथक दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत पथकाकडून कागदपत्रांची तपासणी सुरू होती. पिंपरी कॅम्पातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या निवासस्थानी सकाळी आयकर विभागाचे अधिकारी पाच वाहनांमधून दाखल झाले.

अधिकाऱ्यांनी घराची झडती घेत तपासाला सुरुवात केली. त्याचवेळी त्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात देखील काही अधिकारी पोहोचले. निवासस्थानासह कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली. निवासस्थानात कोणाला जाऊ दिले जात नव्हते. पोलीसही तैनात होते.

सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. आयकर विभाग कोणत्या प्रकरणाची चौकशी करत आहे, याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही. वाकड आणि किवळे येथील बांधकाम व्यावसायिकांवर देखील आयकर विभागाने धाड टाकल्याचे समजते. शहरात एकाच दिवशी आणि एकाचवेळी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे. या छापेमारीची महापालिका बांधकाम विभागातही जोरदार चर्चा होती.

Previous Post

सांगली | सावकारी, अपहरण, मारहाण, छेडछाड यासारखे गुन्हे दाखल असलेल्या निलंबित “पीएसआय”ने हातोड्याने मारहाण करत घातला धिंगाणा.!

Next Post

सांगलीच्या पाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वीज तोडण्याचे आदेेश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीच्या पाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वीज तोडण्याचे आदेेश

सांगलीच्या पाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वीज तोडण्याचे आदेेश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group