• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीच्या पाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वीज तोडण्याचे आदेेश

Admin by Admin
November 24, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगलीच्या पाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वीज तोडण्याचे आदेेश
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा : जिल्हा पाण्यासाठी तहानला असताना महावितरण कार्यालयाकडून उफराटा कारभार करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचा सर्व्हे न करता टेलपर्यंत धोम डाव्या कालव्याचे पाणी पोहचत नसल्याचे कारण देत कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील अपशिंगे, अंभेरी, साप, वेळू, बेलेवाडी या गावांमधील विद्युत मोटारींचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे आदेश महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी रहिमतपूर पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.

यामुळे सांगलीच्या पाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.सांगली जिल्ह्याला कोयना धरण आणि धोम प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. सर्व धरणे व पुनर्वसन सातारा जिल्ह्यातील असताना जिल्ह्यातीलच शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे.

सांगलीला पाणी पोहचत नाही, असे कारण देत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून उफराटा कारभार करण्यात आला आहे. धोम डाव्या कालव्याचे पाणी टेलपर्यंत पोहचत नाही, असे थातूरमातूर कारण सांगून कोरेगाव तालुक्यातील चार गावांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिले आहेत. याची कार्यवाही करण्याची जबाबदारी रहिमतपूरच्या पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्यांवर सोपवण्यात आली आहे. दि. 20 नोव्हेंबर ते दि. 3 डिसेंबर या 13 दिवसांच्या कालावधीत अपशिंगे, अंभेरी, साप, वेळू, बेलेवाडी या गावातील विद्युत मोटारींच्या वीज तोडा, असे फर्मानच काढण्यात आले आहे. सांगलीला पाणी पोहचले का नाही? अतिरिक्त पाणी उपसा होतो की नाही? हे न पाहताच हा तुघलकी कारभार केला जात आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी अशा प्रकारचा आदेश दिला असता ते मान्य करता आले असते. परंतु, महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना हे अधिकार कोणी दिले? धरण व पुनर्वसन सातार्‍यात तर पाणी सांगलीला देवून लाईट सातार्‍याची का तोडता? सांगलीला पाणी पोहचत नाही म्हणणार्‍या अधिकार्‍यांनी पाणी टेलपर्यंत जाते की नाही याचा सर्व्हे केला का? असे सवाल शेतकरी संघटनांकडून उपस्थित केले जात आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

Next Post

रेल्वेचा दोन दिवस मेगाब्लॉक; काही ट्रेन रद्द : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍सप्रेसचाही समावेश : वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
रेल्वेचा दोन दिवस मेगाब्लॉक; काही ट्रेन रद्द : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍सप्रेसचाही समावेश : वाचा सविस्तर

रेल्वेचा दोन दिवस मेगाब्लॉक; काही ट्रेन रद्द : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍सप्रेसचाही समावेश : वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group