• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत गोदाम फोडून तीन लाखांचे कपडे लंपास करणाऱ्या तीन महिलांना अटक, एक लाखांचा माल जप्त

Admin by Admin
November 22, 2023
in क्राईम
1 min read
0
सांगलीत गोदाम फोडून तीन लाखांचे कपडे लंपास करणाऱ्या तीन महिलांना अटक, एक लाखांचा माल जप्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : शहरातील गणपती पेठ परिसरातील बंद गोदाम फोडून त्यातील रेडिमेड कपडे लंपास करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी जेरबंद केले. रंजना सुरेश घाडगे (वय ४०), सुनिता संदीप घाडगे (४२) आणि सुनिता भारत जाधव (३९, तिघीही रा.गोसावी गल्ली, खणभाग, सांगली) असे संशयिताचे नाव आहे.

गणपती पेठेत दिनानाथ नाट्यगृहाजवळ मुमताज अब्दुलरेहमान शेख (रा. हरिपूर रोड,सांगली) यांचे कपड्यांचे गोदाम आहे. यात लहान मुलांचे रेडीमेड कपडे ठेवण्यात आली होती. चारट्यांनी गोदाम फोडून आतील दोन लाख ६३ हजार ३६७ रुपये किंमतीचे कपडे लंपास केले होते. सांगली शहर पोलिसांनी तपास करताना अवघ्या २४ तासात संशयित महिलांना जेरबंद करत मालही जप्त केला. शहर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना महिती मिळाली की, संशयित या चोरीचे कपडे विक्री करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पथकाने जावून तपासणी केली असता, कपड्यांची पोती आढळून आली. यानंतर पोलिस तपासणीत महिलांनी चोरीची कबुली दिली.

तीनही महिला पहिल्यांदाच पोलिस रेकॉर्डवर आल्या असून, त्यांनी आणखीही चोऱ्या, घरफोड्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. सांगली शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनााखाली महादेव पोवार, प्रवीण शिरसाट, संदीप पाटील, योगेश पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

उमदी पोलिसांत तिघांनी अपहरण केल्याची तक्रार ; गुन्हा दाखल

Next Post

Breaking | Kartiki Ekadashi 2023 : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा, दिंडोरीतील घुगे दाम्पत्य मानाचे वारकरी..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Breaking | Kartiki Ekadashi 2023 : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा, दिंडोरीतील घुगे दाम्पत्य मानाचे वारकरी..

Breaking | Kartiki Ekadashi 2023 : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा, दिंडोरीतील घुगे दाम्पत्य मानाचे वारकरी..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group